News Flash

‘द बॅटमॅन’मधील स्टारला करोनाची लागण

सध्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

दिवसेंदिवस करोना व्हायरसचा संसर्ग वाढत चालला आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सनला देखील करोनाची लागण झाली आहे. रॉबर्टला करोनाची लागण झाल्यामुळे त्याचा आगमी चित्रपट ‘द बॅटमॅन’चे अमेरिकेत सुरु असलेले चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

‘द बॅटमॅन’च्या प्रोडक्शन कंपनीने चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले असून पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकामध्ये त्यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. द बॅटमॅनच्या एका सदस्याला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण काही वेळासाठी थांबवण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच रॉबर्ट पॅटिन्सनने या बाबात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण काही हॉलिवूड वेबसाईटने रॉबर्ट पॅटिन्सला करोना झाल्याची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Robert Pattinson (@robertpattinsonofficial) on

लॉकडाउननंतर ‘द बॅटमॅन’ चित्रपटाचे गेल्या तीन दिवसांपूर्वीच लंडन येथे चित्रीकरण सुरु झाले होते. तसेच चित्रपटाचे आणखी तीन महिन्याचे चित्रीकरण बाकी असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी हॉलिवूड सुपरस्टार ड्वेन जॉन्सन आणि त्याच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. त्याने व्हिडीओ पोस्ट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 11:08 am

Web Title: robert pattinson tests coronavirus positive avb 95
Next Stories
1 मुंबईवरुन निर्माण झालेला नेमका वाद काय आणि कंगनाविरोधात संताप का व्यक्त होतोय?
2 …म्हणून ऋषी कपूर स्वत:च्या लग्नात पडले होते बेशुद्ध
3 “ताई, राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा”, सुबोध भावेने कंगना रणौतला सुनावलं
Just Now!
X