News Flash

‘त्याला श्रद्धाशी लग्न करायचे असेल तर…’, रोहन श्रेष्ठाच्या वडिलांचा खुलासा

काय म्हणाले रोहन श्रेष्ठचे वडील?

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून रोहन श्रेष्ठाला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. ते सतत एकत्र फिरताना, डिनर डेटवर जाताना दिसतात. सध्या ते दोघे प्रसिद्ध अभिनेत्री पद्मीनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांकच्या लग्नासाठी मालदीवमध्ये आहेत. त्याच्या लग्नानंतर श्रद्धा आणि रोहन लग्न करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता रोहनचे वडील राकेश श्रेष्ठा यांनी वक्तव्य केलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत, रोहनचे वडील राकेश यांना श्रद्धा आणि रोहनच्या लग्ना विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी, “मी सांगितल्याप्रमाणे ते कॉलेजमध्ये असल्यापासून मित्र आहेत. याशिवाय जुहूमध्ये त्यांचे बरेच कॉमन मित्र आहेत. ते दोघेही आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये व्यवस्थित काम करत आहेत, म्हणून त्यांनी पुढे जाऊन जर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तर तो एक हुशार व प्रौढ लोकांनी घेतलेला असेल” असे म्हटले.

पुढे ते म्हणाले,” जर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तर मी आनंदाने सर्व काही करेन. माझ्या शब्दकोषात आक्षेप हा शब्द नाही, आणि मला सांगायचं आहे की, मी रोहनला ‘माझे स्वप्न’ म्हणून हाक मारतो, मी त्याला क्वचितच रोहन म्हणून हाक मारतो.

पुढे ते म्हणाले, “जेव्हा मी फोटोग्राफर म्हणून सुरूवात केली, तेव्हा माझा स्वत: चा असा एक स्टुडिओ नव्हता. मी माझ्या दुचाकीवर शूट करायला जायचो आणि तिथेच शूट करायचो. त्यात महिन्यातून २० दिवस मी कुठे जेवत असेल तर ते कोल्हापुरेंच्या घरी.”

काही दिवसांपुर्वी श्रद्धाचे वडील अभिनेता शक्ति कपूर यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती.

“काय बातम्या येत आहेत ? किंवा इंटरनेटवर काय चर्चा सुरु आहे? त्या बद्दल मला माहित नाही. पण मी माझ्या मुलीच्या मागे उभा राहणार. रोहन श्रेष्ठाच काय? उद्या श्रद्धाने तिच्या पसंतीने कोणाला निवडले, व त्याच्यासोबत मला आयुष्य घालवायचे आहे, असे सांगितले, तर माझा काहीही आक्षेप नसेल.” असे शक्ती कपूर म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 1:42 pm

Web Title: rohan shrestha s father on shraddha kapoor and rohan s marriage dcp 98
Next Stories
1 ‘विकास दुबे एन्काऊंटर’ आता मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
2 ‘मॅडम माफ करा’, कविता कौशिकने स्क्रीनशॉट शेअर करताच ट्रोल करणाऱ्याने मागितली माफी
3 डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर अमिताभ यांची नवी कविता
Just Now!
X