‘झी मराठी’वरील ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘ई टीव्ही मराठी’वरील ‘चार दिवस सासूचे’ या लोकप्रिय मालिकांनंतर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आता पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘सख्या रे’ या मालिकेत रोहिणी हट्टंगडी एका राजघराण्यातील ‘आईसाहेब’ या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ‘चार दिवस सासूचे’मधील ‘आशालता बाई’ आणि ‘होणार सून मी या घरची’मधील ‘मोठी आजी’ या भूमिका प्रेक्षकांच्या अद्यापही स्मरणात आहेत. ‘सख्या रे’ मालिकेतही रोहिणी हट्टंगडी यांची भूमिका महत्त्वाची आहे. मालिकेत अभिनेता सुयश टिळक व नवोदित अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हे कलाकार आहेत.