28 October 2020

News Flash

रोहिणी हट्टंगडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर; ‘या’ मालिकेत साकारणार भूमिका

उत्कृष्ट अभिनय आणि विशेष लुकचं सरप्राईज अशी दुहेरी धमाल सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे.

रोहिणी हट्टंगडी

‘होणार सून मी या घरची’मधील आई आजी असो, किंवा ‘चार दिवस सासूचे’ मालिकेतील सासू; रोहिणी हट्टंगडी या नावाची जादू नेहमी निराळीच असते. सगळ्यांची लाडकी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. जान्हवीची आजेसासू, ‘झी युवा’ वाहिनीवर एका खट्याळ आजीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

कडक आणि शिस्तप्रिय सासू म्हणून आणि प्रेमळ आजी म्हणून याआधी अनेकदा रोहिणी हट्टंगडी यांना प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. या अष्टपैलू अभिनेत्रीला आता एका वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘डॉक्टर डॉन’ मालिकेतील या आजीचा लुक कसा असेल, याविषयी सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे.

‘झी युवा’ वाहिनीवरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या निमित्ताने एक मॉडर्न आजी रोहिणी हट्टंगडी साकारणार आहेत. आजवर त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा निराळी आणि मजेशीर अशी ही भूमिका असेल. त्यांना एका अफलातून लुकमध्ये पाहण्याची संधी सुद्धा त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. उत्कृष्ट अभिनय आणि विशेष लुकचं सरप्राईज अशी दुहेरी धमाल सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 11:23 am

Web Title: rohini hattangadi coming back on small screen ssv 92
Next Stories
1 कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतो इतकं मानधन; आकडा ऐकाल तर व्हाल थक्क
2 तापसीनं घडवली अद्दल; स्पर्श करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचं मोडलं बोट
3 ग्रेट! अक्षय कुमार करतोय ‘मिशन मंगल’च्या दिग्दर्शकाच्या उपचारांचा खर्च
Just Now!
X