20 January 2020

News Flash

रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार

प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते रोहिणी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

रोहिणी हट्टंगडी

मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला. ५ नोव्हेंबर रोजी कवी,लेखक आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते त्यांना प्रदान केला जाणार आहे.

दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर करण्यात आला आहे. २५ हजार रु. रोख, विष्णुदास भावे पदक, स्मृती चिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

रोहिणी हट्टंगडी यांनी कलाविश्वामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान दिलं असून त्यांनी आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘चार दिवस सासूचे’, ‘वहिनीसाहेब’, ‘सख्या रे’, ‘होणार सून मी या घरची’, ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

First Published on October 12, 2019 11:44 am

Web Title: rohini hattangadi to receive vishnudas bhave award 2019 ssj 93
Next Stories
1 …म्हणून ’83’च्या चित्रीकरणानंतर रणवीरला कोसळलं रडू
2 आई-वडिलांच्या निधनानंतर अशी होती राजकुमारची अवस्था
3 ‘बिग बॉस’च्या घरात बिकिनी घालण्यास ‘या’ अभिनेत्रीचा नकार, म्हणते…
Just Now!
X