13 December 2018

News Flash

ग्लॅमगप्पा : आलियामुळे रोहित नाराज

आलियाने रोहितला नाराज केल्याची कुजबुज ‘बॉलीवर्ल्ड’मध्ये सुरू आहे.

आलिया भट्ट

दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक असलेल्या ‘सिंबा’ या रोहित शेट्टीच्या सिनेमात रणवीर मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे रणबीरसोबत कोणती अभिनेत्री या सिनेमात झळकणार याकडे सर्वाचे लक्ष होतेच. या स्पर्धेत परिणितीने श्रद्धा आणि आलियाला मागे टाकले असले तरी आता याबाबत वेगळीच चर्चा ऐकू येत आहे. आलियाने रोहितला नाराज केल्याची कुजबुज ‘बॉलीवर्ल्ड’मध्ये सुरू आहे. रोहितने आलियाला या सिनेमासाठी विचारले होते. पण आलियाच्या, मला विचार करण्यासाठी वेळ हवा या उत्तरावर रोहित नाराज झाला. आलियाने सिनेमासाठी पटकन होकार द्यायला हवा होता, असे रोहितचे म्हणणे होते. श्रद्धानेही काहीसा तसाच कित्ता गिरवल्याचे चित्र आहे. श्रद्धाने सिनेमाची पूर्ण कथा ऐकवण्याची मागणी केली होती. जे रोहितला शक्य नव्हते. त्यामुळे रोहितने थेट परिणितीलाच चित्रपटात भूमिका दिल्याचे समजते आहे. हा सिनेमा या वर्षीचा सर्वात हिट सिनेमा असेल, असे भाकीत रणवीरने वर्तवले आहे. आता परिणिती-रणवीरची जोडी तो किती ‘हिट’ करते ते येणारा काळच ठरवेल.

-मसक्कली

First Published on March 14, 2018 2:37 am

Web Title: rohit shetty angers on alia bhatt