News Flash

‘देशी पोलिसांच्या आधी येणार विदेशी पोलीस’

विल स्मिथ हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक आहे.

हॉलिवूडस्टार विल स्मिथ हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याची फॅन फॉलोईंग केवळ अमेरिका-युरोपपुरतीच मर्यादित नाही, तर भारतातही त्याचे असंख्य चाहते आहेत. विल आता ‘बॅड बॉईज फॉर लाईफ’ हा चित्रपट घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

अवश्य पाहा – Photo : १३ किलो वजन कमी करणाऱ्या ‘फॅट’ अभिनेत्रीचा ‘फीट’ लूक

आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाचे प्रमोशन बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी करत आहेत. ‘बॅड बॉईज फॉर लाईफ’ या अॅक्शनपटाचे प्रमोशन करणाऱ्या रोहित शेट्टीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. गंमतीशीर बाब म्हणजे हा व्हिडीओ अक्षय कुमारने ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित एका स्पोर्ट्सकारमधून स्टंट मारत येतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांना ‘बॅड बॉईज फॉर लाईफ’ पाहाण्याचे आवाहन करतो.

अवश्य वाचा – कंगना रनौतने घेतला विराट कोहलीशी पंगा

विल स्मिथ हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक आहे. यापूर्वी त्याच्या ‘बॅड बॉईज’ या अॅक्शनपट मालिकेने भारतात विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटांमध्ये विल स्मिथ पोलिसांच्या भूमिकेत दिसतो. कमालीचा विनोद आणि आश्चर्यचकित करणाऱ्या अॅक्शनसीनसाठी प्रसिद्ध ‘बॅड बॉईज’ फ्रेंचाईजीचा ‘बॅड बॉईज फॉर लाईफ’ हा शेवटचा चित्रपट पाहाण्यासाठी आता भारतीय प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 1:04 pm

Web Title: rohit shetty bad boys for life akshay kumar mppg 94
Next Stories
1 बाळासाहेब भाषणातून गप्पा मारायचे पण राज..
2 Video: इंडियन आयडलच्या सेटवर रोहित राऊतने केले दिशा पटाणीला प्रपोज
3 Street Dancer 3D Review : डान्सचा बॉक्स ऑफिसवर ‘मुकाबला’
Just Now!
X