News Flash

रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’च्या चित्रीकरणावेळी गोव्यातील प्रवासी संतप्त

दिग्दर्शक रोहित शेट्टीला शनिवारी गोव्यामध्ये 'दिलवाले' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

| April 5, 2015 12:25 pm

दिग्दर्शक रोहित शेट्टीला शनिवारी गोव्यामध्ये ‘दिलवाले’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पणजी येथे चित्रीकरणावेळी या ठिकाणच्या रस्त्यावर अवैधरित्या लावण्यात आलेले बॅरिकेडस संतप्त प्रवाशांनी पाडून टाकले. शनिवारी दुपारी ही घटना घडली. विशेष म्हणजे या चित्रीकरणासाठी कोणतीही परवानगी न घेता गोव्याच्या राजधानीतील मुख्य रहदारीचा मार्ग बॅरिकेडस लावून रोखण्यात आला होता. त्यामुळे मांडोवी नदीच्या काठावर असणाऱ्या डी.बी. रोडवर वाहनांची गर्दी जमली होती. अखेर प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी या ठिकाणी लावलेले बॅरिकेडस पाडून टाकले. यावेळी रोहित शेट्टी आणि अभिनेता वरूण धवन घटनास्थळावर उपस्थित होते.
यासंदर्भात गोव्यातील राज्य सरकार पुरस्कृत मनोरंजन संस्थेच्या रमण सातर्डेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी, ‘दिलवाले’च्या चित्रीकरणासाठी रस्ता बंद करण्याची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. गोव्यात चित्रीकरण करण्यासाठी या संस्थेची परवानगी लागते. मात्र, अशी कोणतीही परवानगी संस्थेकडून देण्यात आली नव्हती. त्यामुळे ते अशाप्रकारे रस्ता अडवू शकत नसल्याचे सावर्डेकर यांनी सांगितले. दिलवाले या चित्रपटात शाहरूख खान आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2015 12:25 pm

Web Title: rohit shetty film dilwale shoot causes commotion in goa
Next Stories
1 गावखेडय़ातून सिनेमाकडे..
2 बॅनर्जी स्टाईल गुप्तहेरकथा
3 प्रेमाचा गुलकंद
Just Now!
X