23 July 2019

News Flash

‘सिंघम’, ‘सिम्बा’नंतर आता रोहित शेट्टी आणणार ‘लेडी सिंघम’

रोहितला एका महिला पोलिस अधिकाऱ्यावर चित्रपट काढायचा आहे

रोहित शेट्टी

‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न’, ‘सिम्बा’ नंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी महिला पोलिस अधिकाऱ्यावर चित्रपट तयार करण्याच्या विचारात आहे. आतापर्यंत वरील तिन्ही चित्रपटातून रोहित शेट्टीनं पोलिस अधिकाऱ्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. हे तिन्ही चित्रपट तुफान लोकप्रिय ठरले. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं बक्कळ कमाई केली. आता एका महिला पोलिस अधिकाऱ्यावर चित्रपट काढायचा आहे असा मानस रोहित शेट्टीनं बोलून दाखवला आहे.

चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. यासाठी वेळ लागेल मात्र लेडी सिंघम नक्कीच पहायला मिळेल असं रोहित शेट्टीनं सांगितलं आहे. सध्या रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. अक्षय कुमार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. यापूर्वी अजय देवगन, रणवीर सिंगला घेऊन रोहितनं ‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न’, ‘सिम्बा’ हे चित्रपट काढले. मात्र आता महिला पोलिस अधिकारी प्रमुख भूमिकेत असेल असा चित्रपट काढण्याचा त्याचा विचार आहे.

गेल्या तीन चार वर्षांत प्रियांका चोप्राचा ‘जय गंगाजल’ चित्रपट सोडला तर महिला पोलिस अधिकारी केंद्रस्थानी असलेला चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे रोहित शेट्टीची लेडी सिंघम पाहण्याची उत्सुकता ही सगळ्यांना असणार हे नक्की.

 

First Published on March 13, 2019 12:56 pm

Web Title: rohit shetty to make a female cop film