28 September 2020

News Flash

स्मृती इराणींना दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची उत्सुकता, रोनित रॉयचं हटके उत्तर

इन्स्टाग्रामवर एक मजेशीर फोटो टाकत स्मृती इराणी यांनी चाहत्यांची अवस्था दर्शवली आहे

बॉलिवूडमधील अजून एक सेलिब्रेटी जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह बुधवारी विवाहबंधनात अडकले. इटलीमध्ये कुटंबातील काही मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जाऊ नयेत यासाठी दीपिका आणि रणवीरने विशेष काळजी घेतली होती. त्यामुळे लग्नातील दोघांचा एकही फोटो अद्याप समोर आलेला नाही. चाहत्यांना मात्र हे फोटो कधी पहायला मिळतील याची उत्सुकता लागली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचाही समावेश आहे. इन्स्टाग्रामवर एक मजेशीर फोटो टाकत स्मृती इराणी यांनी चाहत्यांची अवस्था दर्शवली आहे.

 

View this post on Instagram

 

#when you have waited for #deepveer #wedding #pics for too longgggg

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

स्मृती इराणींनी जो फोटो शेअर केला आहे तो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. यामध्ये एक सांगाडा बाकड्यावर बसलेला दिसत आहे. त्याखाली इराणींनी कॅप्शन लिहीले की, दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी तुम्ही खूप काळ वाट पाहता तेव्हा….

इराणींच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली असून आपली प्रतीक्रिया नोंदवली आहे. अनेकांनी आपली अशीच अवस्था झाली असल्याचं म्हटलं आहे. प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये अभिनेता रोनित रॉयचाही समावेश आहे. ‘वो जिंदा होगा…वो मिहिर है’, अशी प्रतीक्रिया रोनित रॉयने दिली आहे. टेलिव्हिजनवर मिहिरचा कमबॅक चांगलाच गाजला होता. याच पार्श्वभूमीवर रोनित रॉयने ही प्रतीक्रिया दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 1:18 pm

Web Title: ronit roy comment on smriti irani post waintig ranvir deepika wedding pics
Next Stories
1 ‘केबीसी’मध्ये लाखो रुपये जिंकूनही नागपूरचा मुलगा परतला रिकाम्या हातीच
2 अवघ्या काही तासांत जगासमोर येणार दीप-वीरच्या लग्नाचा पहिला फोटो
3 #DeepVeerKiShaadi : विवाहसोहळ्याच्या सुरक्षेसाठी केलेला खर्च ऐकून थक्क व्हाल
Just Now!
X