News Flash

‘बिग बॉस’मधील अंकित गेराच्या सहभागाने विशेष फरक पडणार नाही’

अंकित गेरा 'बिग बॉस'मध्ये स्पर्धक म्हणून असला तरी रुपलला याची विशेष चिंता नाही.

अंकित गेरा आणि रुपल त्यागी 'बिग बॉस'च्या नवव्या पर्वात सहभागी झाले आहेत.

छोट्या पडद्यावरील आणि खऱ्या आयुष्यातील पूर्वाश्रमीची जोडी अंकित गेरा आणि रुपल त्यागी ‘बिग बॉस’च्या नवव्या पर्वात सहभागी झाले आहेत. आपल्याबरोबर पूर्वाश्रमीतला प्रियकर अंकितदेखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून असला तरी आपण याची विशेष चिंता करत नसल्याचे रुपल म्हणाली. ‘सपने सुहाने लडकपन के’ या मालिकेत अंकित आणि रुपल एकत्र काम करत असताना दोघांमध्ये प्रेमाचे बंध घट्ट होत गेले. परंतु, फसवणुकीच्या कारणावरून कालांतराने दोघांमध्ये फारकत झाल्याचे बोलले जाते. या शोमध्ये कोण सहभागी आहे अथवा कोणाचा सहभाग नाही याची मी काळजी करत नाही. या घरात कोणालाही प्रवेश मिळाला तरी माझ्यासाठी ती सामान्य बाब आहे. मी इथे जिंकण्याच्या आशेने खेळ खेळायला आले आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही शुल्लक गोष्ट आहे, ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्याआधी वृत्तसंस्थेशी बोलताना रुपल म्हणाली. ‘बिग बॉस’च्या चालू पर्वातील चौदा स्पर्धकांपैकी रुपल एक स्पर्धक आहे. या शोमध्ये भाग घेण्याबाबत आधी आपण साशंक होतो. परंतु मिळालेली संधी न दवडण्याचा विचार करत कालांतराने आपण होकार दिल्याचे तिने सांगितले. सुपरस्टार सलमान खान सहाव्यांदा या शोचे सूत्रसंचालन करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 3:17 pm

Web Title: roopal tyagi unnerved by ex ankit geras presence in bigg boss nau
Next Stories
1 राजपाल यादव ‘जिलेबीवाला’च्या भूमिकेत
2 ‘दगडी चाळ’नंतर येतोय ‘दगडाबाईची चाळ’!
3 अबरामच्या ‘शूज’चे अनोखे कलेक्शन
Just Now!
X