News Flash

कपिल शर्माच्या घरात तिचे पुनरागमन

नंतर ती या कार्यक्रमातून गायब झाली होती

'कामेडी नाईट्स विथ कपिल' या कार्यक्रमामुळेच कपिल शर्मा देशात प्रसिद्धीच्या झोतात आला.

द कपिल शर्मा शो हा अनेक कलाकारांनी मिळून केलेली मजा मस्ती यासाठीच अधिक ओळखला जातो. त्यांच्या या संपूर्ण टीममुळेच हा कार्यक्रम अधिक प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या या टीममध्ये टीव्ही जगतातल्या अनेक नावाजलेल्या अभिनेत्रीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. सुमोना चक्रवर्तीसोबतच रोशनी चोप्राही या कॉमेडी शोमध्ये दिसत होती. नंतर ती या कार्यक्रमातून गायब झाली. पण तिने पुन्हा एकदा या टीमसोबत काम सुरु केले आहे.

नुकतेच तिने एका भागाचे चित्रिकरणही केले. तिचा हा आनंदाचा क्षण तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन शेअर केला. ती कपिलच्या घरी पुन्हा परतली आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की रोशनी या कार्यक्रमात फार आधी पासून होती. ती सुमोनाच्या बहिणीची व्यक्तिरेखा साकारायची. रोशनी या कार्यक्रमात फारच सुंदर दिसायची. तिचे विनोदाचे ‘टायमिंग’ही सुरेख होते. त्यामुळे तिला परत एकदा या कार्यक्रमात पाहणे औत्सुक्याचे ठरेल यात काही शंका नाही. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये कपिल त्याच्या स्टायलिश दाढीमध्ये दिसत आहे. त्याचा आगामी सिनेमा फिरंगसाठी त्याने हा लूक ठेवला आहे. रोशनी गरोदरपणामुळे इतके दिवस टीव्हीसृष्टीपासून लांब होती. तिने रेयान या तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. तिला जयवीर हा तीन वर्षांचा मोठा मुलगाही आहे.

रोशनी एक उत्तम आई तर आहेच शिवाय ती अभिनय आणि फॅशन डिझायनिंग या क्षेत्रातही सक्रिय असते. रोशनीने इंडो- वेस्टर्न प्रकारचे कपडे डिझाइन केले आहेत. अनेक सेलिब्रिटींना तिने डिझाइन केलेले कपडे आवडलेत. सध्या ती आपल्या दोन्ही मुलांमध्ये फार व्यग्र आहे. रोशनी आणि तिचे पती आनंद कुमार यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 6:03 pm

Web Title: roshni chopra make an comeback with kapil sharma show and shares her happiness
Next Stories
1 डोनाल्ड ट्रम्प ‘त्या’ भारतीय सौंदर्यवतीच्या हॉलिवूड पदार्पणासाठी मदत करणार?
2 सैफचा हा ‘क्यूट’ व्हॉट्स अॅप डिपी पाहिलात का?
3 बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने १२ वाजता सलमानला दिल्या होत्या शुभेच्छा
Just Now!
X