News Flash

RRR सिनेमातील ‘राम’चा लूक रिलीज; असा आहे सीताचा बलवान, धनुर्धर राम!

"ही भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे."

बाहुबली सारख्या जगभरात गाजलेल्या सिनेमानंतर एस. एस. राजामौलींचा RRR या सिनेमा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सिनेमाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या सिनेमात राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगन, समुथीराकिनी, ऑलिव्हिया मॉरिस असे कलाकार झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी म्हणजेच आलियाच्या वाढदिवसाचं निमित्त साधत या सिनेमातील तिचा पहिला लूक रिलीज करण्यात आला होता.

आलियानंतर आता या सिनेमात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रामचरण तेजाचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. राम चरणच्या वाढदिवसाचं निमित्त साधत या सिनेमाचं एक पोस्टर रिलीज करण्यात आलं असून यात राम चरणचा लूक चाहत्यांसाठी समोर आणला आहे. अभिनेता राम चरण याने सोशल मीडियावर त्याच्या सिनेमातील लूकचं पोस्टर शेअर केलं आहे. त्याच्या या लूकला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

राम चरणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. यात त्याने ” शौर्य, सन्मान, प्रामाणिकपणा, एक व्यक्ती तो या सर्वांची व्याख्या सांगेल. ही भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे.” असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलंय. हातात धनुष्य आणि गळ्यात रिद्राक्षांच्या मााळा, लांब केस आणि सुदृढ शरीर असा राम चरणचा फोटोमधील लूक एखाद्या योद्ध्याला शोभेल असाच आहे.

१९२०च्या दशकातली ही कथा असून उत्तर भारतातल्या दोन आदिवासी प्रमुख नेत्यांसंदर्भातली आहे. हे दोन नेते म्हणजे अल्लुरी सिताराम राजू आणि कोमाराम भीम. या दोन्ही भूमिका अनुक्रमे रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर करत आहेत. खरंतर हा चित्रपट गेल्या वर्षी जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनाच्या संकटामुळे प्रदर्शन लांबणीवर पडलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt)

या सिनेमाचं पूर्ण नाव ‘आरआरआर’ म्हणजे ‘रौद्रम रणम रुधिरम’ असं आहे. 10 भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आलिया तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहे. या सिनेमा येत्या १३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 9:24 am

Web Title: rrr ram charan teja first look poster featuring ram on his birthday kpw 89
Next Stories
1 परेश रावल यांना करोनाची लागण; १८ दिवसांपूर्वीच घेतला होता करोना लसीचा पहिला डोस
2 जिच्या हातावर थुंकलो ती नंबर वन; आमिरच्या कृत्याने जूही चावला संतापली
3 लॉकडाउनच्या काळात गौरीने सजवले शाहरुखचे ऑफिस, शेअर केला फोटो
Just Now!
X