28 September 2020

News Flash

राजकुमारच्या लग्नमंडपावर २ कोटी रुपयांचा खर्च!

शाही लग्नसोहळ्याच्या सेटवर दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

राजकुमार काही खरोखर लग्न करत नाहीये. तर आगामी ‘शादी में जरूर आना’ चित्रपटात तो काम करतोय.

बॉलिवूडमधील हरहुन्नही अभिनेता राजकुमार राव याच्या लग्नासाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राजकुमारचं लग्न तरी कधी ठरलं? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. अहो, असे गोंधळून जाऊ नका. राजकुमार काही खरोखर लग्न करत नाहीये. तर आगामी ‘शादी में जरूर आना’ चित्रपटात तो काम करतोय. त्याच्या या चित्रपटातील लग्नाच्या सेटवर तब्बल दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

अभिनयात आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या राजकुमारच्या चित्रपटांचा बजेट नेहमी कमी असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. मात्र, त्याचा ‘शादी में जरूर आना’ हा चित्रपट त्याला अपवाद आहे. या चित्रपटातील शाही लग्नसोहळ्याच्या सेटवर दोन कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या सेटवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘निर्मात्यांसाठी पैसा महत्त्वाचा मुद्दा नव्हता. त्यांना शक्य तितक्या लवकर हा लग्नाचा सेट तयार करून हवा होता. दिग्दर्शक अरुप अदिकारी, सेट डिझायनर शबीउल हसन आणि त्याच्या टीमने फक्त तीन दिवसांमध्ये हा भव्य सेट उभा केला आहे. आतापर्यंत बॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखविण्यात आलेल्या लग्नाच्या दृश्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे चित्रीकरण यात पाहायला मिळणार आहे.’

‘शादी में जरूर आना’ चित्रपटात राजकुमार रावसोबत अभिनेत्री क्रिती खरबंदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. एक सामान्य माणूस कशाप्रकारे मोठा सरकारी अधिकारी बनतो यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हाची पत्नी रत्ना सिन्हा या रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतेय. अलाहाबाद, लखनऊ आणि कानपूर येथे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आलेय.

राजकुमार रावचे ‘बहन होगी तेरी’ आणि ‘राबता’ हे दोन चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 5:35 pm

Web Title: rs 2 crore spent on rajkummar rao wedding set in shaadi mein zaroor aana
Next Stories
1 अमेरिकेत सुट्टीचा आनंद घेतोय ‘बाहुबली’
2 ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ नंतर ‘खिचडी’ प्रेक्षकांच्या भेटीला?
3 PHOTOS: … चालू वर्षात या सेलिब्रिटी किड्सचा पहिलावहिला बर्थडे बॅश
Just Now!
X