News Flash

सामान्यांना ‘ऐ दिल है….’ पाहणे ‘मुश्किल’?

या चित्रपटाला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे

ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यातील केमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळणार

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या मार्गातील सर्वच अडचणी दूर झाल्यामुळे आता ठरलेल्या तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विविध चेहरे पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्यामुळे सध्या या चित्रपटासंबंधी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जवळपास अनेक चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटासाठीचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. पण एका ठिकाणचे ‘ऐ दिल है…’च्या तिकिटाचे दर पाहता अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसेल.

२०१६ मधील बहुचर्चित चित्रपटांमध्ये ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ट्रेड अॅनालिस्टसच्या म्हणण्यानुसार ‘ऐ दिल है मुश्किल’, या चित्रपटाला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. प्रेक्षकांची या चित्रपटाला मिळणारी पसंती पाहता चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाच्या तिकीट दरांमध्येही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ७० रुपयांपासून ते थेट २२०० रुपयांपर्यंतच्या दरांत या चित्रपटाची तिकीटे उपलब्ध आहेत. २२०० रुपये ऐकून चकीत होण्याची काहीच गरज नाही. दिल्लीच्या ‘पीव्हीआर डायरेक्टर्स कट’मध्ये ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाची तिकीट २२०० रुपयांना विकली जात आहे. करणच्या ‘ऐ दिल है….’ चे हे दर पाहता हा चित्रपट पाहण सामान्यांसाठी मुश्किल होऊन बसणार आहे असेच दिसतेय.

अभिनेता रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खानही एका भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर आणि ऐश्वर्याची सिझलिंग केमिस्ट्री पाहण्याची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच २८ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 4:10 pm

Web Title: rs 2200 is the most expensive ticket that is available for ae dil hai mushkil
Next Stories
1 VIDEO: जेव्हा प्रियांका चोप्रा ‘अॅलेन डिजेनेर्स’च्या कार्यक्रमात टकीला शॉट मारते..
2 ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘शिवाय’ला पाकिस्तानमध्ये बंदी
3 सलमान खानच्या अंगरक्षकावर गुन्हा दाखल
Just Now!
X