बॉलीवूड चित्रपटांच्या बजेटची ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे प्रेक्षकांना नवीन नाहीत. पण आता चित्रपटाच्या बजेटबरोबरच चित्रपटातील भूमिकेच्या विशिष्ट लूकसाठीही अव्वाच्या सव्वा खर्च केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कतरिना कैफच्या आगामी ‘फितूर’या चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत हे घडले आहे. चित्रपटातील तिची भूमिका आणि तिच्या लाल रंगाच्या केसांवर थोडेथोडके नव्हे तर तब्बल ५५ लाख रुपये खर्च केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

कतरिनाच्या केसांचा रंग लाल रंग आणि ‘फितूर’मधील तिच्या केसांचा नवा लुक सोशल मीडिया आणि फॅशन विश्वात चच्रेचा विषय बनला आहे.

या लूकसाठी निर्मात्याला तब्बल ५५ लाख रुपयांचा खर्च करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. एका संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या बातमीत ही माहिती देण्यात आली आहे.

या नव्या लुकसाठी कतरिनाला लंडनला जावे लागले. या नवीन लुकसाठी कतरिनाला भारतात एकही हेअर स्टाइलिस्ट पसंतीस आला नाही. त्यामुळे केवळ केसांना कलर करून घेण्यासाठी कतरिनाला काही दिवसांसाठी लंडनला राहावे लागले, असेही या बातमीत म्हटले आहे. कतरिना या चित्रपटात फिरदौसच्या भूमिकेत दिसणार असून आदित्य रॉय कपूर हा या चित्रपटात नूरची भूमिका साकारणार आहे. काश्मीरच्या पाश्र्वभूमीवर असलेली ही प्रेम कहाणी चार्ल्स डिकेन्सच्या ‘ग्रेट एक्सपेक्टेशन्स’ या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट १२ फेब्रुवारी रोजी प्रदíशत होणार आहे.