News Flash

‘मला अभिनवपासून घटस्फोट हवा होता,पण…’; रुबिना दिलैकने केला धक्कादायक खुलासा

रुबिनाला रडताना पाहून अभिनवच्या डोळ्यांच्या कडादेखील पाणावल्या

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच गाजलेला शो म्हणजे ‘बिग बॉस’. यंदा या शोचं १४ वं पर्व असून अगदी पहिल्या दिवसापासून हा कार्यक्रम चर्चेत आहे. आतापर्यंत या शोमध्ये अनेक वादग्रस्त घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, आता हा कार्यक्रम अभिनेत्री रुबिना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांच्यामुळे चर्चेत आला आहे. अलिकडेच रुबिनाने तिच्या आणि अभिनवच्या नात्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

‘बिग बॉस १४’ पहिल्यांदाच एका पती-पत्नीच्या जोडीने सहभाग घेतला. त्यामुळे सध्या अभिनव आणि रुबिना या जोडीची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. बिग बॉसमध्ये सहभागी झालेली ही जोडी एकाच टीममध्ये होती. मात्र, अनेकदा त्यांच्यात खटके उडाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ही जोडी कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली. त्यातच आता रुबिनाने अभिनवसोबतच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा केला असून बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी ही जोडी घटस्फोट घेणार होती असं तिने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)


‘बिग बॉस’च्या आगामी भागात घरातील स्पर्धकांना त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं गुपित उघड करायचं आहे. यामध्येच रुबिना आणि अभिनवने बिग बॉसमध्ये येण्याचं कारण सांगितलं. त्याचबरोबर ते घटस्फोट घेणार असल्याचंही सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

“एक वेळ अशी आली होती, जेव्हा मला अभिनवपासून घटस्फोट हवा होता. त्यामुळे आम्हाला नोव्हेंबरपर्यंत विचार करण्याचा कालावधी देण्यात आला होता. याचदरम्यान आम्हाला बिग बॉस १४ ची ऑफर आली. या शोच्या निमित्ताने आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवता येईल यासाठीच आम्ही या शोची ऑफर स्वीकारली”, असं रुबिनाने सांगितलं आणि तिला रडू कोसळलं. विशेष म्हणजे रुबिनाला रडताना पाहून अभिनवच्या डोळ्यांच्या कडादेखील पाणावल्या.

वाचा :  अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवून दोन वर्ष केला बलात्कार, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

दरम्यान, अभिनय आणि रुबिना ही जोडी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापूर्वीपासून त्यांच्या नात्याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र सध्या या दोघांमधील वाद मिटला असून त्यांनी त्यावर तोडगा काढल्याचं सांगण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 11:18 am

Web Title: rubina abhinav in bigg boss 14 reason divorce secret spilled out ssj 93
Next Stories
1 आशिकी फेम राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका, नानावटी रुग्णालयात दाखल
2 सोनू सूदने दिला चाहत्याला मदतीचा हात; उचलला शस्त्रक्रियेचा खर्च
3 दीपिका- कतरिनाला पाहिल्यानंतर…; कियाराने केला ‘या’ गोष्टीचा खुलासा