सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेला शो म्हणजे बिग बॉस १४. यंदाच्या पर्वामध्ये अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी सहभागी झाली आहेत. त्यामुळे रोज या शोमध्ये नवनवीन किस्से, टास्क रंगत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता बिग बॉसच्या घरात अभिनेत्री रूबिना दिलैक आणि पती अभिनव शुक्ला या जोडीने करवाचौथ साजरा केला. त्यामुळे सध्या ही जोडी चर्चेत आहे. विशेष म्हणजे अभिनवने बिग बॉसच्या घरात राहूनच रुबिनाला एक खास गिफ्ट दिल्याचं पाहायला मिळालं.
करवाचौथ निमित्ताने अभिनवने रुबिनाला दिलेलं गिफ्ट सध्या चांगलंच चर्चेत आलं असून हे गिफ्ट रुबिनासाठी बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी उपयोगी पडणार आहे. अलिकडेच रंगेल्या टास्कमध्ये रुबिना रेड झोनमध्ये गेली होती. मात्र, अभिनवने तिला रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आणलं आहे. त्यामुळे रुबिना आता नॉमिनेशनपासून सुरक्षित राहिली आहे.
दरम्यान, बिग बॉस हा खेळ दिवसेंदिवस रंजक वळणावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. या घरात रोज नवीन टास्क, खेळ रंगत आहेत. तर अनेकदा घरातील सदस्यांमध्ये भांडणं होत आहेत. त्यामुळे सध्या हा शो चांगलाच चर्चिला जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 6, 2020 4:21 pm