News Flash

‘आत्महत्या करण्याचे विचार…’, ७ वर्षांपूर्वी असे काय घडले की रुबीना आजही विसरु शकली नाही

तिने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १४’ची विजेती म्हणजे रुबीना दिलैक. ती लवकरच ‘शक्‍त‍ि- अस्‍त‍ित्‍व के एहासास की’ या मालिकेतील पुनरागमन करणार आहे. काही दिवसांपूर्वी ती बॉलिवूड गायिका नेहा कक्करचे व्हिडीओ साँग ‘मरजानिया’मध्ये पती अभिनव शुक्लासोबत दिसली होती. पण रुबीनाचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. एक काळ असा होती की रुबीना कित्येक तास एकटी असायची, आत्महत्या करण्याचा विचार देखील तिच्या डोक्यात आला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये रुबीनाने खुलासा केला आहे.

रुबीनाने ‘बॉलिवूड हंगामा’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने नैराश्यामध्ये असल्याचा खुलासा केला. ‘मी ७ ते ८ वर्षांपूर्वी नैराश्याचा सामना करत होते. मला अस्थिर आणि असुरक्षित असल्या सारखे वाटायचे. मला त्या वेळी कळत नव्हते की मी काय करावे. मी माझी प्रोफेशनल आणि प्रायवेट लाइफ योग्य पद्धतीने सांभाळू शकत नव्हते. मी कुटुंबीयांपासून देखील लांब गेले होते. मी सतत काम करत रहायचे. माझ्याकडे मित्र-मैत्रीणी बनवायला देखील वेळ नव्हता. मी स्वत:ला सर्वांपासून लांब करुन घेतले होते. एकटेपणामुळे आत्महत्या करण्याचे विचार माझ्या डोक्यात येत होते’ असे रुबीना म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

पुढे ती म्हणाली, ‘मी ऑडिओ टेप्स ऐकणे सुरु केले होते. सेल्फ हेल्फचा कोर्स करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी पाहिले की माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते का. मी ऑनलाइन काउंसिलिंग थेरेपी घेतली. मी पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. मला फक्त शांतता हवी होती.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 2:47 pm

Web Title: rubina dilaik life 7 years ago a phase of battling depression and suicidal thoughts avb 95
Next Stories
1 ‘तू परत येना प्लीज’, आईच्या आठवणीत अर्जुन झाला भावुक
2 नेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ व्हायरल
3 ‘बोल्ड सीन देण्यास माझा नकार नाही, पण…’, नेहा पेंडसेचा खुलास
Just Now!
X