News Flash

‘माझ्याशी पंगा घेऊ नका’, रुबिनाचा फोन नंबर लीक होताच पती संतापला

त्याचे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस १४’ या रिअॅलिटी शोची विजेती अभिनेत्री रुबिना दिलैकचा फोन नंबर लीक झाला आहे. एका वेब साइटवर तिचा नंबर देण्यात आला होता. तिला अनेकजण फोन, मेसेज करु त्रास देऊ लागले होते. त्यानंतर रुबिनाचा पती अभिनेता अभिनव शुक्लाने मित्राच्या मदतीने त्या वेबसाइटवरुन नंबर डिलिट केला. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ‘माझ्याशी पंगा घेऊ नका’ असे म्हटले आहे.

अभिनवने ट्वीट करत रुबिनाचा नंबर व्हायरल झाल्याचे सांगितले आहे. ‘एका बेकायदेशीर वेबसाइटने अनेक अभिनेत्रींचे नंबर लीक केले आहेत. आता ते हटवण्यात आले आहेत. हे सर्व करण्यासाठी मला माझ्या इंजिनीअर मित्राने मदत केली त्यासाठी त्याचे आभार. कधीही इंजिनीअरशी पंगा घेऊ नका’ या आशयाचे ट्वीट त्याने केले आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीला पतीने दिली BMW बाइक गिफ्ट

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अभिनवने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे. फोन नंबर लीक झाल्यानंतर रुबिनाला सतत मेसेज आणि कॉल आल्यानंतर ती वैतागली. त्यानंतर अभिनवने त्याच्या कॉलेजमधील मित्राला फोन करुन याबाबत माहिती दिली आणि त्या वेब साइटवरील नंबर हटवले. समोर आलेल्या माहितीनुसार त्या बेकायदेशीर वेबसाइटवरुन जवळपास १०० पेक्षा अधिक सेलिब्रिटींचे नंबर लीक करण्यात आले होते.

रुबिना आणि अभिनव यांनी ‘बिग बॉस १४’मध्ये सहभाग घेतला होता. त्या दोघांची घरात भांडणेही झाली होती. पण रुबिनाने अनेकांची मने जिंकत बिग बॉस १४चे विजेतेपद पटकावले. आता ती लकरच एका मालिकेत काम करताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 1:41 pm

Web Title: rubina dilaik number was public by a website abhinav deleted with help friend avb 95
Next Stories
1 महाराष्ट्रात संचारबंदी पण तरीही पाहायला मिळणार ‘या’ मालिकांचे नवे भाग…..जाणून घ्या कारण!
2 आलिया भट्टची करोना चाचणी नेगेटिव्ह; फोटो शेअर करत म्हणाली…
3 सुझान खान डेट करते ‘बिग बॉस १४’मधील स्पर्धकाच्या भावाला? फोटोवरील कमेंट चर्चेत
Just Now!
X