01 March 2021

News Flash

रुबीना दिलैक ठरली ‘बिग बॉस 14’ची विजेती, चाहत्यांचे मानले आभार

राहुल वैद्यला टक्कर देत रुबीनाची बाजी

बिग बॉसच्य़ा चौदाव्या सिझनचा ग्रॅण्ड फिनाले नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. चाहत्यांची सर्वाधिक पसंती मिळवत अभिनेत्री रुबीना दिलैक बिग बॉसच्या चौदाव्या पर्वाची विजेती ठरली आहे. राहुल वैद्यला टक्कर देत रुबीनाने विजेते पदाची ट्रॉफी पटकावली आहे.

3 ऑक्टोबर 2020 ला बीग बॉस-14 चा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. तब्बल 140 दिवस हा शो चालला. बिग बॉसच्या पर्वांमधील सर्वाधिक दिवसांचं हे पर्व ठरलं आहे. 12 स्पर्धकांपासून या पर्वाला सुरुवात झाली होती. मात्र शोमध्ये रंगत आणण्यासाठी कालांतराने शोमध्ये काही कलाकारांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. शोच्या सुरवातीपासूनच रुबीनाने तिच्या दमदार परफॉर्मन्सने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)


रुबीना पती अभिनव शुक्लासोबत बिग बॉसच्या घरात दाखल झाली होती. संपूर्ण पर्वात रुबीना आणि अभिनवची केमिस्ट्री देखील पाहायला मिळाली. असं असलं तरी रुबीनाने संपूर्ण पर्वात स्वत:ची भूमिका ठाम ठेवली. बिग बॉसच्या घरात रुबीनाने अनेकदा स्पर्धकांच्या निर्णयाला विरोध केला. तर अनेकदा योग्य निर्णयाच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. रुबीना तिच्या परफॉर्मन्समुळे कायम चर्चेत राहिली. सोशल मीडियावरुन चाहत्यांनी रुबीनाला कायम पसंती दिली.

आणखी वाचा- रुबीनाचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास, चाहत्यांच्या मनावर केलं राज्य

पाच स्पर्धकांनी बिग बॉस-14 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. यात रुबीना दिलैक, राहुल वैद्य, निकी तांबोली, अली गोनी आणि राखी सावंत यांनी बाजी मारली . मात्र अखेरच्या दोन स्पर्धकांमध्ये फक्त रुबीना दिलैक आणि राहुल वैद्य यांचा नंबर लागला. संपूर्ण पर्वातच राहुल आणि रुबीना दोघांमध्ये चुरस पाहायला मिळाली.
यात प्रेक्षकाचे सर्वाधिक वोटस् मिळवत रुबीनाने बिग बॉसच्या 14व्या सिझनच्या विजेतेपदावर नाव कोरलं. ट्रॉफी सोबतच 36 लाख रुपये बक्षिस म्हणून जिंकली आहे. याविजयानंतर रुबीनाने सोशल मीडियावरुन सर्व चाहत्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

सलमान खानने विजेत्याचं नाव घोषित करण्याआधी सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली होती. राहुल वैद्य की रुबीना याकडे साऱ्यांच लक्ष होतं. मात्र या प्रवासात उत्तम कामगिरी करत रुबीनाने विजेते पदाचा मान पटकावला. अनेक मालिकांमधून रुबीनाने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 10:21 am

Web Title: rubina dilaik wins bigg boss 14 season kpw24
Next Stories
1 ‘होणार सून…’फेम मंदार देवस्थळीने कलाकारांचे पैसे थकवले; अभिनेत्रीचा गंभीर आरोप
2 ‘हरि ओम’मधील ‘त्या’ दोघांच्या भूमिकांवरील पडदा दूर; हे कलाकार साकारणार मु्ख्य भूमिका
3 करिश्मा पुन्हा मावशी झाली, शेअर केला ‘हा’ फोटो
Just Now!
X