करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. पण परिस्थिती पूर्वपदावर येताच चित्रपटगृहे खुली करण्यात आली. त्यासाठी सरकराने नियमावली तयार केली. करोना व्हायरसचे सावट असतानाही चाहत्यांसाठी ‘रुही’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसर चांगली कमाई केली आहे. तसेच हा चित्रपट काही चित्रपटगृहांमध्ये हाऊसफूल ठरला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘रुही’ चित्रपटाने बॉक्स किती कमाई केली याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. रुही चित्रपटाने आता पर्यंत १२.५८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. गुरुवार ३.०६ कोटी रुपये, शुक्रवारी २.२५ कोटी रुपये, शनिवारी ३.४२ कोटी रुपये आणि रविवारी ३.८५ कोटी रुपये कमाई केली आहे. चित्रपटाने चार दिवसांमध्ये १२. ५८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

वांद्रे येथील Gaiety Galaxy या चित्रपटगृहामध्ये रुही हा चित्रपट हाऊसफूल ठरला. २०२१मध्ये हाऊसफूल ठरणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.

‘स्त्री’ चित्रपटानंतर राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा ‘रुही’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ११ मार्चला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘रुही-आफजा’ असे ठेवण्यात आले होते. मात्र या चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला आहे. आता ‘रुही’ असे या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले.