News Flash

रुपेरी पडद्यावर ‘खान त्रिकूट’ एकत्र!

बॉलीवूडमधील आघाडीचे अभिनेते मि.परफेक्टशनिस्ट आमिर, बादशाहा शाहरुख, आणि दबंग सलमान ह्या खान त्रिकूटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची

| June 1, 2015 02:36 am

बॉलीवूडमधील आघाडीचे अभिनेते मि.परफेक्टशनिस्ट आमिर, बादशाहा शाहरुख, आणि दबंग सलमान ह्या खान त्रिकूटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या तिघांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्याचे अनेकांचे स्वप्न असून लवकरचं हे तिघे एकत्र काम करताना दिसू शकतात.
‘डीएनए’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, निर्माता साजिद नादियदवाला यास तिन्ही खानांना एकत्र आणण्यास यश आले आहे. ही पहिलीचं वेळ असेल जेव्हा हे तिनही खान एकाच चित्रपटात काम करताना दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, २०१७च्या सुरुवातीला चित्रीकरणास सुरुवात होईल आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल. साजिद हा सलमानचा खूप जवळचा मित्र आहे. तसेच, आमिर आणि शाहरुखसोबत सुद्धा त्याचे चांगले मैत्रीसंबंध आहेत. त्यामुळे साजिद त्यांना नक्कीचं एकत्र आणेल असे सांगितले जात आहे.
२०१७ साल म्हणजे तरी अजून दीड वर्षांचा अवकाश आहे. तोपर्यंत या खानावळीत काय होईल हे काही सांगावयास नको. बघू, साजिद नादियदवालाचे हे स्वप्न पूर्ण होते का? जर हे तिघे खान एकत्र आले तर त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही मेजवानी असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 2:36 am

Web Title: ruling khans shah rukh khan salman and aamir to share screen space
टॅग : Salman Khan
Next Stories
1 मॉरिशस मध्ये रंगणार ‘अजिंक्यतारा’
2 नात्यांचे अवघड समीकरण
3 रिअ‍ॅलिटीचे वास्तव : ज्ञानापेक्षा चेहरा महत्वाचा!
Just Now!
X