‘मिस युनिव्हर्स’ म्हणून नावाजलेली अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळेही बरीच चर्चेत असते. सध्याच्या घडीला सुष्मिता चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती सातत्याने चाहत्यांच्या संपर्कात असते. इतकेच नव्हे तर, ‘सिंगल मदर’ म्हणूनही ती आपली जबाबदारी पार पाडते. पण, जोडीदाराच्या बाबतीत मात्र तिच्या वाट्याला पुन्हा एकदा अपयशच आले आहे.

सध्या सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या चर्चांनुसार सुष्मिता आणि तिचा प्रियकर रितिक भसिन यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुष्मिता आणि रितिक गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मध्यंतरी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचीही चर्चा होती. मात्र, त्याआधीच या दोघांचा ब्रेकअप झाला आहे.

वाचा : जाणून घ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ‘डाएट प्लॅन’

काही महिन्यांपूर्वी सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन केलेल्या पोस्ट पाहता ती रितिकसोबतचे नाते सर्वांसमोर स्वीकारेल, असे अनेकांना वाटत होते. पण, परिस्थिती बदलत गेली आणि हे दोघेही वेगळे झाले. रितिकच्या आधीही सुष्मिताचे नाव बऱ्याच जणांशी जोडले गेले होते. रणदीप हुड्डा, विक्रम भट्ट, इम्तियाज खत्री, मदुस्सर अजीज, शब्बीर भाटीया, संजय नारंग यांच्यासोबत तिचे नाव जोडले गेले होते. सुष्मिताच्या प्रेमप्रकरणांच्या यादीवर नजर टाकल्यास रितिक तिचा दहावा प्रियकर असल्याची चर्चा होती. मात्र, हे नाते दीर्घकाळ टिकू शकले नाही.