News Flash

सारिका यांना त्यांचे घर परत मिळवून देण्यासाठी आमिरचा पुढाकार?

या घरावर आपला हक्क असल्याचा दावा सारिका यांनी केला आहे.

सारिका, आमिर खान

बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असणाऱ्या अभिनेत्री सारिका यांना सध्या वैयक्तिक आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वत:च्या घराची मालकी मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असून अभिनेता आमिर खान त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्याचे वृत्त ‘डीएनए’ने प्रसिद्ध केले आहे. सारिकाच्याच पैशांनी तिच्या आईसाठी घेण्यात आलेल्या घरावर डॉ. विक्रम ठक्कर नावाच्या व्यक्तीने मालकी हक्क सांगितला आहे. त्यामुळे हा वाद न्यायालयात गेला आहे.

नोव्हेंबर महिन्यात सारिकाच्या आईच्या मृत्युनंतरच या सर्व वादाला सुरुवात झाली. मुंबईतील जुहू भागात असणाऱ्या भानू अपार्टमेंट येथे सारिका यांच्या आईचे आलिशान घर आहे. पण, काही कारणांनी त्यांच्या आईने इच्छापत्रातून या मालमत्तेतून सारिका यांना बेदखल करत मालमत्तेचे हक्क आपल्याला दिल्याचा दावा डॉ.विक्रम ठक्कर यांनी केला आहे. पण, ही मालमत्ता मी स्वत:च्या पैशांनी खरेदी केली होती. त्यामुळे या घरावर आपला हक्क असल्याचा दावा सारिका यांनी केला आहे.

VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका सध्या भाड्याच्या घरात राहात आहेत. काही वर्षांपूर्वी अभिनेता कमल हसन यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर सारिका कलाविश्वात पुनरागमन करण्यासाठी मुंबईत आल्या. सध्याच्या घडीला त्यांची मोठी मुलगी अभिनेत्री श्रुती हसन हिचे स्वत:चे घर असून, लहान मुलगी अक्षरा चेन्नई आणि मुंबईत ये-जा करत असतात. पण, सारिका यांचे स्वत:चे घर नसल्यामुळे सध्या त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सारिकां यांना मदत करण्यासाठी आमिर खान पुढे सरसावल्याचे म्हटले जातेय. आमिरची बहिण म्हणजेच अभिनेता इमरान खानची आई आणि सारिका या खूप चांगल्या मैत्रिणी असल्यामुळे सारिका यांनी आमिरकडे मदत मागितल्याचे म्हटले जातेय. याविषयी आमिरला विचारले असता त्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 11:54 am

Web Title: rumors has perfectionist bollywood actor aamir khan stepped in to help actress sarika reclaim her home
Next Stories
1 रिंकूच्या नव्या चित्रपटाचं नाव कळलं का?
2 प्रियांका चोप्राला पाच मिनिटांसाठी पाच कोटी मिळाले तर गैर काय?
3 मुंबईत या ठिकाणी होणार ‘विरुष्का’च्या लग्नाचे रिसेप्शन
Just Now!
X