20 February 2019

News Flash

रशियन प्रियकराशी लग्न करण्याच्या चर्चांविषयी ‘ही’ अभिनेत्री म्हणते….

...म्हणून ती राजस्थानला जाणार आहे

श्रिया सरन

कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये नेहमीच कुतूहल पाहायला मिळतं. सध्याच्या घडीलाही अशाच एका अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याविषयी बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. ती अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन. ‘दृश्यम’ चित्रपटातून अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर करणारी श्रिया येत्या काळात तिच्या रशियन प्रियकरासोबत लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांनी नुकताच जोर धरला होता. इतकच नव्हे, तर राजस्थामध्ये तिचा विवाहसोहळा पार पडेल असंही म्हटलं जात होतं.

काही महिन्यांपूर्वीच श्रिया आणि तिच्या प्रियकराची भेट झाली होती. सध्या ती त्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रशियाला गेली असून, मार्च महिन्यात ती लग्न करणार असल्याचंही म्हटलं गेलं. श्रियाच्या प्रियकराविषयी आणखी कोणतीच माहिती समोर आली नसल्यामुळे तिचा रशियन प्रियकर नेमका आहे तरी कोण, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. पण, खुद्द श्रियाचं या साऱ्यावर काही वेगळच मत मांडलं.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

View this post on Instagram

Work mode! GAYATRI promotion.

A post shared by @ shriya_saran1109 on

आपल्या लग्नाच्या अवाजवी चर्चा रंगण्यास सुरुवात झाल्याचं पाहून श्रियाने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे, असं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलं. श्रियाच्या लग्नाच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं तिच्या आईनेही स्पष्ट केलं. एका मैत्रिणीच्या आणि कुटुंबातील एका व्यक्तीच्या लग्नात सहभागी व्हायचं असल्यामुळेच ती राजस्थानला जाणार आहे. त्यामुळे तिच्या लग्नाच्या या चुकीच्या चर्चा रंगल्या असल्याचंही तिच्या आईने स्पष्ट केलं. श्रियाच्या आईने दिलेलं हे कारण पाहता त्यावर आता कितीजण विश्वास ठेवतात हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा. कारण, गेल्या काही दिवसांमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीवर एक नजर टाकली तर, त्यात श्रियाच्या नावाचाही समावेश होण्याची चिन्हं आहेत, असाच अंदाज अनेकांनी वर्तवला आहे.

First Published on February 7, 2018 1:37 pm

Web Title: rumors south indian actress shriya saran to get hitched to russian boyfriend in march actress says she not getting married