News Flash

जान्हवी कपूर ‘या’ अभिनेत्याला करते डेट?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंवरुन या चर्चा सुरु झाल्या आहेत.

‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर. या चित्रपटात जान्हवीसोबत अभिनेता इशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसला होता. त्यानंतर जान्हवीने ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ या चित्रपटात काम केले. त्यावेळी जान्हवी चर्चेत होती. पण सध्या जान्हवी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. ती एका अभिनेत्याला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या जान्हवीचे अभिनेता कार्तिक आर्यनसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन दोघेही गोव्याला एकत्र असल्याचे म्हटले जात आहे. जान्हवी कार्तिकला डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी कार्तिकने ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्याने छान असे कॅप्शन दिले आहे. त्यावर जान्हवी कपूरने कमेंट केली होती. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. आता त्या दोघांचा एकत्र फोटो व्हायरल झाल्यामुळे अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmy World (@filmy_w0rld)

आणखी वाचा- जान्हवी कपूरने जुहूमध्ये घेतलं नवीन घर; किंमत ऐकून व्हाल थक्क!

आता त्या दोघांचा एअरपोर्टवरील फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. कार्तिक आणि जान्हवी गोव्यावरुन येत असल्याचे म्हटले जात आहे. ते दोघे चित्रपटानिमित्त गोव्याला गेले होते की फिरायला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण सध्या जान्हवी कार्तिकला डेट करत असल्याच्या चर्चा मात्र रंगल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 1:32 pm

Web Title: rumoured couple kartik aaryan and janhvi kapoor spotted holidaying in goa avb 95
Next Stories
1 नेहा पेंडसे आता अनिता भाभीच्या रुपात; ‘भाभी जी घर पर हैं’ मध्ये लवकरच होणार एण्ट्री
2 टायगर-दिशाच्या रिलेशनशिपबद्दल अनिल कपूर यांनी केलं वक्तव्य, म्हणाले..
3 ‘कुछ कुछ होता है’मधील परजान दस्तूरने बांधली लग्नगाठ; पाहा फोटो
Just Now!
X