28 October 2020

News Flash

नवरात्रीनिमित्त रुपाली भोसलेचा दुर्गावतार, पाहा फोटो

नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव.

रुपाली भोसले

नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. गणपती उत्सव संपला म्हणजे वेध लागतात नवरात्रीचे. जागोजागी देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. घटस्थापनेच्या दिवशी अभिनेत्री रुपाली भोसले हिने दुर्गावतारातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग राखाडी असल्याने रुपालीने राखाडी रंगाची साडी परिधान केली आहे. दुर्गा देवीची शक्ती ही प्रत्येक महिलेत असते असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.

देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:’ असेच म्हटले जाते. एरवी, ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ अशी तिची प्रार्थना केली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 5:42 pm

Web Title: rupali bhosle posted a photo in durga avtar ssv 92
Next Stories
1 मुसळधार पाऊस अन् चित्रपटाचं चित्रीकरण; ‘सरसेनापती हंबीरराव’चं शुटींग पूर्ण
2 “डिप्रेशनवरुन खिल्ली उडवणं थांबवा, अन्यथा…”; इराने दिला ट्रोलर्सला इशारा
3 तारा सुतारिया- आदर जैन लवकरच बांधणार लग्नाची गाठ?
Just Now!
X