22 October 2020

News Flash

माजी मिस इंडियापाठोपाठ बहिणीलाही करोनाची लागण

सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

सध्या संपूर्ण देशात दिवसेंदिवस करोना व्हायरसचा संसर्ग वाढत चालला असल्याचे दिवस आहे. सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी, राजकिय नेते यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध मॉडेल, माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री नताशा सूरीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. आता त्यापाठोपाठ तिची बहिणी रुपाली सुरीची देखील करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

रुपालीने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. ‘माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मला ताप, सर्दी आणि घसा दुखी ही लक्षणे जाणवत होती. पण मी माझा योगा आणि श्वसनाशी संबंधीत व्यायाम करत आहे. जर तुम्ही सकारात्मक विचार केलात तर नक्कीच करोनावर मात कराल’ असे रुपालीने पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

Becoz self love is very important. #love #selflove #selfie #happyme

A post shared by Rupali Suri (@rupalisuri07) on

रुपालीची बहिण नताशा ९ ऑगस्टरोजी पुण्याला गेली होती. पुण्याहून मुंबईला परतल्यानंतर प्रकृती बिघडली अन् करोनाची लक्षणं जाणवली. ताप, गळ्यात खरखर आणि अशक्तपणा जाणवल्यानंतर नताशानं तीन दिवसांपूर्वी करोनाची चाचणी केली. या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे. आता रुपालीचा देखील करोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 11:18 am

Web Title: rupali suri tests covid 19 positive after sister natasha avb 95
Next Stories
1 बॉलिवूड कलाकरांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
2 सुशांतने फ्लॅट घेऊन दिला? आरोप करणाऱ्यांना अंकितानं दाखवला आरसा
3 उपचारासाठी विदेशात जाण्यापूर्वी संजूबाबा करणार ‘हे’ काम
Just Now!
X