News Flash

उर्वशी रौतेला डेट करते या क्रिकेटरला?

ते दोघे डेटवर गेल्याचे म्हटले जाते

बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला. ती तिच्या  चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे नाव अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत जोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी तर उर्वशी भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होता. पण आता तिचं नाव आणखी एका क्रिकेटपटूशी जोडण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उर्वशी या क्रिकेटपटूसोबत रात्री उशिरापर्यंत फिरत होती.

‘स्पॉटबॉय-ई’ने दिलेल्या वृत्तानुसार उर्वशी ऋषभ पंतला डेट करत आहे. ते दोघेही १० डिसेंबर रोजी ११च्या सुमारास डेटवर गेल्याचे म्हटले जात आहे. हे दोघे जुहूमधील ईस्टेला हॉटेलमध्ये एकत्र डिनर करताना दिसले. विशेष म्हणजे T20 मॅच सुरु होण्याच्या एक दिवसआधी डिनर डेटवर गेल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी उर्वशी वृषभ पंतला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. काही मीडिया रिपोर्टनुसार हार्दिक आणि उर्वशीची भेट एका पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर ते दोघे डेटवर जाताना दिसले. पण उर्वशीने हे सर्व अफवा असल्याचे म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. नंतर हार्दिक सुद्धा उर्वशी नाही नताशा स्तांकोविकशी रिलेशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

आणखी वाचा : मानधनात उर्वशीने सलमानला टाकले मागे, तासाभरासाठी घेतलेली रक्कम वाचून व्हाल अवाक

काही दिवासांपूर्वी उर्वशीचा ‘पागलपंती’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जॉन अब्राहम, अनिल कपूर, अरशद वारसी, कृती खरबंदा, पुलकित सम्राट आणि इलियाना डिक्रूज हे कलाकार झळकले होते. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आता लवकरच उर्वशी एका तामिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुशी गणेशन करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 1:30 pm

Web Title: rushabh pant is dating this bollywood actress avb 95
Next Stories
1 अतरंगी रणवीर दिसणार ‘सुपरहिरो’च्या भूमिकेत
2 Video : ‘तान्हाजी’मधील ‘माय भवानी’ गाणं प्रदर्शित
3 ‘छपाक’आधी ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटातून उलगडली अ‍ॅसिडग्रस्त तरुणीची कथा
Just Now!
X