News Flash

महानायकाच्या मुलीने प्रसारमाध्यमांना फटकारले, नव्यापासून दुर राहण्याचाही दिला सल्ला

माझ्या मुलीच्या आयुष्यातील खासगी क्षण तुम्ही परत देऊ शकता का?

महानायकाच्या मुलीने प्रसारमाध्यमांना फटकारले, नव्यापासून दुर राहण्याचाही दिला सल्ला
श्वेता नंदा बच्चन यांनी लेखणीतून प्रसारमाध्यमांना लक्ष्य केले.

प्रसिद्धी मिळविण्यासाठी प्रसारमाध्यमांनी आपल्या मुलीचे खासगी आयुष्य जगासमोर आणले, असा आरोप महानायक अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता नंदा यांनी केला आहे. श्वेता यांनी आपल्या मुलीचे खासगी आयुष्य उध्वस्त करणाऱ्यांचा लेखणीतून समाचार घेतला. त्यांनी डिएनए वृत्तपत्रामध्ये ‘अ मदर रिक्वेस्ट’नावाचा स्तंभ लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. या लेखामध्ये त्यांनी आपली मुलगी नव्या नवेलीच्या आयुष्यावर भर देत तिच्यापासून माध्यमांनी दुर रहाण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. नव्या नवेली अजून लहान असून इतर लहान मुलांप्रमाणेच तिच्याही सवयी असल्याचे त्यांनी या लेखात लिहले आहे. श्वेता यांनी आपल्या मुलीच्या जीवन शैलीचा उलघडा करताना मित्रांसोबत राहणे, फोटो काढणे या गोष्टीची नव्याला आवड असल्याचे म्हटले.तसेच नव्या पार्टीसाठी बाहेर जाते, असे सांगत ती वेळेत घरी परतते असे देखील सांगितले. नव्या समुद्र किनाऱ्यावर आनंद साजरा करत असताना सभ्यतेला शोभेल अशीच वस्रे परिधान करते, या ओळीने त्यांनी आपल्या लेकीला संस्कृतीचे भान असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
नव्या ट्विटरवर सक्रिय नसल्याची माहिती देखील श्वेता नंदा बच्चन यांनी लेखातून दिली. बॉलीवूडसंदर्भात वृत्त देणाऱ्या काही वेब साइटस् नव्यामध्ये अधिक रुची दाखवत असून नव्याच्या मित्रांशी संपर्कातून नव्याचे फोटो मिळवतात, असा आरोप देखील श्वेता नंदा यांनी लखणीतून केला. माझ्या मुलीच्या आयुष्यातील खासगी क्षण तुम्ही परत देऊ शकता का? असा सवाल करत श्वेता नंदा यांनी प्रसारमाध्यमांनी नव्याचे आयुष्यात वादळे निर्माण करु नयेत असे लिहले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2016 7:58 pm

Web Title: s daughter shweta bachchan slashes on media for invading her daughter
Next Stories
1 अरबाजमुळे मलाइकाच्या आनंदावर विरजण, तिने प्रसारमाध्यमांवर काढला राग
2 रितेश देशमुखने शेअर केला त्याच्या मुलाचा पहिला फोटो
3 ‘क्वीन’ चित्रपटाच्या सिक्वलची तयारी सुरू
Just Now!
X