News Flash

छोटे गायक येत आहेत स्वरांनी तुमचं मन जिंकायला, ‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्पचं नवं पर्व

या पर्वाचे नावीन्य म्हणजे ह्या पर्वात कोणतही एलिमिनेशन होणार नाही.

झी मराठीवरील ‘सा रे ग म प’ लिटील चॅम्प या शोमुळे अनेक नवोदित गायकांचं भविष्य घडलं. या शोमुळे महाराष्ट्राला नाजूक सुरांची मेजवानी अनुभवता आली. झी मराठीचा ‘सा रे ग म प’ हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंच आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. या मंचाने आजवर अनेक उत्तमोत्तम गायक, गायिका, संगीतकार या मोनोरंजन क्षेत्राला दिले आहेत.

सा रे ग म प’च्या या प्रवासात अनेक पर्व गाजली आणि त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो १२ वर्षांपूर्वी झालेल्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा. अनेक टॅलेंटेड लिटिल चॅम्प्सच्या अफलातून परफॉर्मन्सेसमुळे हे पर्व तुफान गाजलं. या छोट्या मुलांच्या गाण्यांना साथ होती ती म्हणजे ‘कमलेश भडकमकर’ आणि त्यांचा वादक मित्रांची. या पर्वातील महाअंतिम फेरीत पोहोचलेली पंचरत्न म्हणजेच  रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनी प्रेक्षकांची मन तर जिंकलीच पण या कार्यक्रमाने या पंचरत्नांना संगीत क्षेत्रात उतरण्यासाठी तयार केलं आणि त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

आता जवळपास १२ वर्षांनी सा रे ग म प लिटिल चॅम्प्स” पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय. विशेष म्हणजे यावेळी स्पर्धेत जजेस नसून ज्युरी असणार आहेत, हे ज्युरी दुसरे कोणी नसून आपले ‘पंचरत्न’ असणार आहेत. हे ज्युरी आपल्या छोट्या स्पर्धकांचे मोठं स्वप्न साकारण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ‘मृण्मयी देशपांडे’ करणार आहे.

या पर्वाचे नावीन्य म्हणजे ह्या पर्वात कोणतही एलिमिनेशन होणार नाही. छोट्या स्पर्धकांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं कोणतंही दडपण नसेल. हो पण एलिमिनेशन नसलं तरी या गायक मित्र मैत्रिणींना आपलं गाणं रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे. म्हणजेच ह्या १४ छोट्या स्पर्धकांचा महाअंतिम सोहोळ्यापर्यंतचा प्रवास अनोखा असणार हे नक्की. येत्या २४ जूनपासून प्रेक्षकांना लहानग्यांची सुरांची पर्वणी अनुभवता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 5:25 pm

Web Title: sa re ga ma pa little champs marathi new season will coming soon kpw 89
टॅग : Entertainment
Next Stories
1 ‘दर्या किनारी…’ गाण्यावर ‘तारक मेहता…’मधील दयाबेनचा कोळी डान्स व्हायरल, बोल्ड लूक पाहून चाहते थक्क
2 गेल्या ४८ तासांपासूनची जगण्यासाठीची झुंज संपली; कन्नड अभिनेता संचारी विजय यांचं अपघाती निधन
3 Sushant Singh Rajput: हे चार प्रश्न अजूनही अनुत्तरीतच
Just Now!
X