24 November 2020

News Flash

महाराष्ट्र सरकारवर आरोप करणाऱ्या साहिल चौधरीला अटक; कंगनाने केली सुटकेची मागणी

क्राईम ब्रांचने केली अटक

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकारवर आरोप करणाऱ्या साहिल चौधरी नामक एका युट्यूबरला मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे. या कारवाईवर अभिनेत्री कंगना रणौत हिने संताप व्यक्त केला. साहिलला सोडून अनुराग कश्यपला अटक करावी, अशी मागणी तिने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

अवश्य पाहा – महिला कलाकारांचीच चौकशी का केली जातेय?; अभिनेत्रीचा NCBला सवाल

“मुंबईमध्ये गुंडांचं राज्य सुरु आहे. कोणीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारु शकत नाही. जर कोणी प्रयत्न केला तर त्याचं घर तोडलं जातं. सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या साहिल चौधरीला अटक केली. त्याला त्वरित तुरुंगात पाठवलं. पण पायल घोषसोबत लैंगिक गैरवर्तणुक करणाऱ्या अनुरागवर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. हे महाराष्ट्रात काय चाललं आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने पुन्हा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – VIDEO: संतापलेल्या अभिनेत्याचं शक्ती प्रदर्शन; हातांनीच केले लोखंडी गेटचे दोन तुकडे

कोण आहे साहिल चौधरी?

साहिल चौधरी एक युट्यूब ब्लॉगर आणि मॉडेल आहे. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून प्रतिक्रिया देतो. सुशांत मृत्यू प्रकरणावरुन त्याने महाराष्ट्रातील अनेक राजकिय मंडळींवर आरोप केले होते. या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. परिणामी दिल्लीमध्ये जाऊन मुंबई क्राईम ब्रांचने त्याला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 2:45 pm

Web Title: saahil choudhary arrested by mumbai crime branch sushant singh rajput kangana ranaut mppg 94
Next Stories
1 कोठारेंची जलपरी! उर्मिलानं शेअर केला ‘जिजा’चा खास व्हिडीओ
2 रेस्तराँमध्ये लावले ‘बाहुबली’, ‘राधेश्याम’चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट
3 त्या फोटोवरुन ट्रोल करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; दिली कायदेशीर कारवाईची धमकी
Just Now!
X