26 September 2020

News Flash

Saaho Box Office Collection : प्रभासच्या चित्रपटाची बक्कळ कमाई

'बाहुबली : द कन्क्लुजन' या चित्रपटाच्या दोन वर्षांनंतर प्रभास प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'साहो'

प्रभास व श्रद्धाची मुख्य भूमिका असलेला ‘साहो’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. ३५० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी बक्कळ कमाई केली आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साहो’ने पहिल्या दिवशी तब्बल ६८ कोटी रुपये कमावले आहेत. तर फक्त भारतात हिंदी भाषेतील चित्रपटाने २४.४० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ‘साहो’ची फक्त भारतातील कमाई पाहिल्यास २०१९ या वर्षात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर ‘भारत’ तर दुसऱ्या क्रमांकावर ‘मिशन मंगल’ आहे. ‘साहो’ चित्रपटात प्रभास व श्रद्धासोबतच नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक सुजीतने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Movie Review : असह्य ‘साहो’

‘साहो’ने ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ व ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या दोन चित्रपटांना पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाच्या दोन वर्षांनंतर प्रभास प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा आहेत. सोशल मीडियावर ‘साहो’ला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2019 1:52 pm

Web Title: saaho box office collection day 1 prabhas and shraddha kapoor film earns this much ssv 92
Next Stories
1 Birthday special : ‘या’ एका चित्रपटामुळे राजकुमारचे नशीब बदलले!
2 Photo : क्रिती सॅनॉन होणार सरोगेट मदर?
3 ‘सूरमा’नंतर तापसी साकारणार ‘या’ खेळाडूची भूमिका
Just Now!
X