27 September 2020

News Flash

‘..म्हणून कटप्पाने बाहुबलीला मारलं’; प्रभासच्या ‘साहो’वर भन्नाट मीम्स व्हायरल

हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

दोन वर्षांनंतर अभिनेता प्रभास ‘साहो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. ३५० कोटी रुपये बजेट, तगडी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला नाही. शुक्रवारपासून सोशल मीडियावर ‘साहो’ची जोरदार चर्चा असून नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट मीम्ससुद्धा शेअर केले आहेत. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

सोशल मीडियावर जरी ‘साहो’साठी संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत असल्या तरी पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केली आहे. पहिल्या दिवशी जगभरात या चित्रपटाने ६८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ अशा तीन भाषांमध्ये ‘साहो’ प्रदर्शित झाला आहे.

Movie Review : असह्य ‘साहो’

‘साहो’ चित्रपटात प्रभास व श्रद्धासोबतच नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक सुजीतने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘साहो’ने ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ व ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या दोन चित्रपटांना पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाच्या दोन वर्षांनंतर प्रभास प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा आहेत. सोशल मीडियावर ‘साहो’ला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2019 3:37 pm

Web Title: saaho movie review in best memes new prabhas film has internet laughing hard ssv 92
Next Stories
1 शिवानी ठरावी ‘बिग बॉस 2’ची विजेती, ‘या’ अभिनेत्यांची आहे तीव्र इच्छा
2 पुण्यातल्या गणेशोत्सवाची मजाच वेगळी – ईशा केसरकर
3 Saaho Box Office Collection : प्रभासच्या चित्रपटाची बक्कळ कमाई
Just Now!
X