News Flash

‘साजन’ चित्रपटाचे निर्माता सुधाकर बोकाडे यांचे निधन

'साजन' चित्रपटाचे निर्माता सुधाकर बोकाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी रात्री निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आला.

| July 8, 2013 06:39 am

‘साजन’ चित्रपटाचे निर्माता सुधाकर बोकाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी रात्री निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आला. बोकाडे यांना श्वसन प्रक्रियेत अडथळा येत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
‘साजन’, ‘प्रहार’, ‘सनम तेरी कसम’ आणि ‘धनवान’ या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. त्यांच्यामागे दिव्या आणि किरण या त्यांच्या दोन मुली आणि मुलगा कृष्णा असा परिवार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 6:39 am

Web Title: saajan producer sudhakar bokade passes away
Next Stories
1 हृतिकच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर गौरी खान, करण जोहरने रुग्णालयात दिली भेट
2 मीशा शफीचे ‘भाग मिल्खा भाग’द्वारे बॉलिवूड पदार्पण
3 ‘मेंटल’ चित्रपटात नादिरा बब्बर करणार सलमानच्या आईची भूमिका
Just Now!
X