24 September 2020

News Flash

‘सारे तुझ्याचसाठी’मध्ये बॉक्सिंग आणि शास्त्रीय संगीताचं बांधलं जाणार बंधन

लगीनघाई सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या 'सारे तुझ्याचसाठी' या मालिकेत पाहायला मिळत आहे. निमित्त आहे श्रुती-कार्तिकचं लग्न.

'सारे तुझ्याचसाठी' मालिकेत श्रुती आणि कार्तिकचं लग्न

दिवाळीचा सण सरला आणि तुळशीचं लग्न लागलं, की सुरूवात होते लगीन सराईला. लग्न हासुद्धा जणू एक सणच, ज्यामध्ये दोन जीवांचं आणि दोन कुटुंबांचं मिलन होतं. जितकी तयारी एखाद्या सणाची व्हावी त्याच्या दुपटीने लग्नाची तयारी केली जाते. हीच लगीनघाई सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. निमित्त आहे श्रुती-कार्तिकचं लग्न.

तसं पाहायला गेलं तर हे अरेंज मॅरेज. पण या दोघांमध्ये प्रेम कधी उमललं हे त्यांनाही कळलं नाही. साखरपुडा झाल्यानंतर बॉक्सिंगच्या प्रेमाखातर श्रुतीने लग्नापुढे केलेली बॉक्सिंगची निवड आणि त्यामुळे मोडलेला त्यांचा साखरपुडा, नव्याने फुलणाऱ्या या गोड नात्याला पूर्णविराम लागतो की काय असं वाटत असतानाच कार्तिकच्या पुढाकाराने शेवटी हे सुत जुळलं. दुरावा सहन न झाल्याने कार्तिकने श्रुतीच्या सरांना लग्नानंतर श्रुतीच्या बॉक्सिंगवर काहीही परिणाम होणारी नाही, असं वचन देत लग्नासाठी परवानगी मिळवली. तुळशीच्या लग्नानंतरचा पहिला मुहूर्त बघून आपल्या लग्नाचा बार उडवून द्यायचा निर्णय घेतला आहे.

Shakeela biopic: अडल्ट स्टार शकीलाच्या रुपातील रिचाला पाहिलं का?

लग्नाआधी मनाला लागणारी हूरहूर या दोघांच्याही चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये आता लगीनघाई सुरू झाली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात एकमेकांसाठी निर्माण झालेली ओढ, त्या ओढीतून सहवासासाठी शोधली जाणारी वेगवेगळी कारणं ‘सारे तुझ्याचसाठी’ या कार्यक्रमाच्या शीर्षकाला अगदी तंतोतंत लागू पडत आहेत. लग्नसोहळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आमंत्रणाचं. आमंत्रणाला २० नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे तर याच दरम्यान त्यांचं केळवणही होणार आहे. २२ नोव्हेंबरला कार्तिकची बॅचलर्स पार्टी तर २३ नोव्हेंबरला मेहंदीचा कार्यक्रम आहे. २४ नोव्हेंबरला हळद आणि २६ तारखेला विवाहसोहळा आहे.

वेगळे स्वभाव, वेगळी व्यक्तीमत्त्व, विरूध्द टोकाच्या आवडी जोपासणाऱ्या श्रुती – कातिर्कच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सोनी मराठीवर सुरू आहे. तेव्हा बॉक्सिंगचा संगीताशी होणारा हा मेळ अनुभवायला ही मालिका पाहावी लागणार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 3:33 pm

Web Title: saarey tujyach saathi marathi serial shruti and kartik wedding preparation begins
Next Stories
1 ‘राष्ट्रीय पुरस्कार ही सर्वात मोठी जबाबदारी’
2 Shakeela biopic: अडल्ट स्टार शकीलाच्या रुपातील रिचाला पाहिलं का?
3 Video : ‘नशीबवान’मधील ‘ब्लडी फुल…’ गाणं प्रदर्शित
Just Now!
X