24 September 2020

News Flash

साथ निभाना साथिया २ : ‘ही’ अभिनेत्री साकारणार कोकिलाबेनची भूमिका

पाहा, कोकिलाबेनची भूमिका कोण साकारणार

छोट्या पडद्यावर विशेष लोकप्रिय झालेली साथ निभाना साथिया ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयीच चर्चा सुरु आहे. या दुसऱ्या भागात नेमके कोणते कलाकार दिसणार आणि महत्त्वाचं म्हणजे कोकिलाबेन आणि गोपी बहु यांच्या भूमिकेत कोणते कलाकार पाहायला मिळणार ही उत्सुकला प्रेक्षकांना लागली आहे. त्यातच आता अभिनेत्री रुपल यांनी या कोकिलाबेन या भूमिकेत कोण झळकणार हे सांगितलं आहे.

अलिकडेच ‘साथ निभाना साथिया २’ टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच पुन्हा गोपी बहुच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र कोकिलाबेन ही भूमिका कोण साकारणार हे गुलदस्त्यात होतं.परंतु, रुपल यांनी या भूमिकेवरील पडदा दूर केला असून त्या स्वत:च पुन्हा कोकिलाबेनच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं सांगितलं आहे.

“कोकिशिवाय साथ निभाना साथियाचा दुसरा भाग पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे या नव्या भागातदेखील कोकिलाबेन आहे. ही भूमिका मीच साकारत आहेत. ज्या दिवशी मला साथ निभाना साथिया २ साठी ऑफर आली, त्या रात्री मला झोपच लागली नाही. कारण मला एका वेळी एकाच मालिकेत काम करायला आवडतं. मात्र राजन सर आणि रश्मी मॅडमने मला धीर दिला आणि हे करणं मला शक्य होईल असा विश्वास दिला. त्यामुळे मला या मालिकेत पुन्हा काम करणं शक्य झालं”, असं रुपल यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 3:17 pm

Web Title: saath nibhaana saathiya actress rupal patel aka kokilaben on show second part ssj 93
Next Stories
1 “..तर लोकांना मी खोटं बोलतोय असं वाटेल”; पंकज त्रिपाठींनी घराणेशाहीबद्दल मांडलं वेगळं मत
2 कॅडीने घातलाय साडी नेसायचा घाट
3 अभिनेत्री तापसीने जया बच्चन यांना दिला पाठिंबा; म्हणाली…
Just Now!
X