News Flash

पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर सलमानला म्हणाली, ‘छिछोरा’

मी पाकिस्तानमध्ये अ- श्रेणीतली अभिनेत्री आहे

पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरही लवकरच हिंदी मीडियम या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यात तिच्यासोबत इरफान खान याची मुख्य भूमिका आहे. अजूनही भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध फारसे चांगले झालेले नाहीत. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होणार की नाही हे इतक्यात सांगणे कठीण असेल.

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती. भारताकडून अशा प्रकारची बंदी घातल्यानंतर पाकिस्ताननेही भारतीय सिनेमे तिथे दाखवण्यावर बंदी घातली होती. पण कालांतराने त्यांना याचे मोठे नुकसान सहन करावे लागल्यामुळे त्यांनी ही बंदी उठवली होती.

शाहरुख खानच्या रईस सिनेमातून माहिरा खान हिची भूमिका रद्द जरी करण्यात आली नसली तरी तिला या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सहभागी होता आले नव्हते. ती सोशल मीडियावरुनच या सिनेमाचे प्रमोशन करत होती. याशिवाय रईस सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी माहिरा खानचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता.

आता अशाच प्रकारचा एक व्हिडिओ अभिनेत्री सबा कमरचाही व्हायरल झाला आहे. गूड मॉर्निंग जिंदगी या पाकिस्तानी टॉक शोमध्ये सबाला बॉलिवूड अभिनेत्यांचे फोटो दाखवून या कलाकारांना जर नकार द्यायचा असेल तर तू काय कारण देशील असा प्रश्न विचारण्यात आला होता.
पहिला फोटो हृतिक रोशनचा दाखवण्यात आला होता. त्याचा फोटो पाहून सबा म्हणाली की, मला दोन मुलांचा पिता असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करायचे नाही, असे तिने सांगितले. यानंतर इमरान हाश्मीचा फोटो दाखवण्यात आला. यावर त्याला मोठा नकार देत म्हणाली की, मला तोंडाचा कर्करोग नकोय. त्यामुळे याला नक्कीच नाही असे सबा म्हणाली.

यानंतर रितेश देशमुखचाही फोटो दाखवण्यात आला. त्याला नकार देताना सबा म्हणाली की, ‘मी पाकिस्तानमध्ये अ- श्रेणीतली अभिनेत्री आहे, त्यामुळे मी भारतातही अ- श्रेणीतल्या व्यक्तीसोबतच काम करणे पसंत करेन.’ यात रणबीर कपूरचाही फोटो दाखवण्यात आला होता. पण सबाला रणबीर आवडत असल्यामुळे मी याला लग्नासाठी नाही बोलूच शकत नाही असे तिने सांगितले. पण तरीही नाहीच असे बोलायचे असेल तर दीपिका पादुकोणसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्यामुळे मी त्याला नाही बोलेन असे ती पुढे म्हणाली.

सगळ्यात शेवटी दबंग सलमान खानचा फोटो दाखवण्यात आला होता. ‘तू खूप छिछोरा आहे. तो नृत्यदिग्दर्शकाचं कधीच ऐकत नाही. नेहमी स्वतःचेच स्टेप्स बनवतो आणि त्यावर डान्स करतो.’ आता सबाच्या या व्यक्तव्यावर भाईजान कशाप्रकारे उत्तर देणार हे तर फक्त तोच सांगू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 3:51 pm

Web Title: saba qamar salman chhichhora insult hrithik viral video
Next Stories
1 बाबा गुरमीत राम रहीमच्या चित्रपटाने ‘जॉली’ अक्षयलाही टाकले मागे
2 ब्लॉग : मग चित्रपट पाहायला फारसे काहीच शिल्लक राहत नाही…
3 बच्चन यांच्या फॅमिली फोटोतून श्वेता ‘आउट अॅण्ड इन’
Just Now!
X