News Flash

Sachin A Billion Dreams : ‘सचिनसारखा क्रिकेटपटू असलेल्या देशात जन्मल्याचा अभिमान’

मैं उस देश का वासी हूँ जिस देश में सचिन बहता है !!!

सचिन :अ बिलियन ड्रिम्स, अमिताभ बच्चन यांनी सचिनसारखा खेळाडू असलेल्या देशात आपला जन्म झाल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.

क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरे ‘सचिन :अ बिलियन ड्रिम्स’ चित्रपटाच्या भव्य प्रिमियरच्या निम्मिताने काल संध्याकाळी एकत्र आलेले पाहायला मिळाले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावरील हा चित्रपट पाहिल्यानंर भावूक झालेल्या अमिताभ बच्चन यांनी सचिनसारखा खेळाडू असलेल्या देशात आपला जन्म झाल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासह बिग बी प्रिमियरला उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर बायोपिकमध्ये स्वतःच भूमिका साकारणाऱ्या सचिनची बॉलिवूडच्या शहेनशहाने प्रशंसा केली.

वाचा : प्रिमियरमध्ये कलाकारांच्या मांदियाळीतही सचिनचे सारावरच लक्ष

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या अमिताभ यांनी सचिन आणि त्याची पत्नी अंजली हिच्यासोबतचे प्रिमियरमधील काही फोटो पोस्ट केले. चित्रपटाचे कौतुक करत अमिताभ यांनी लिहिलं की, ‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’ चित्रपट पाहिल्यानंतर अभिमानाने माझा ऊर भरून आला आहे. मैं उस देश का वासी हूँ जिस देश में सचिन बहता है !!! क्रिकेटच्या जगतात ज्याला देव मानले जाते अशा सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर ‘सचिन :अ बिलियन ड्रिम्स’ चित्रपट आधारित आहे. यात मैदानावरील आणि मैदानाबाहेरील सचिनच्या प्रवासाची झलक पाहावयास मिळेल.

वाचा : हा माझ्या मनातील घडामोडींचा चित्र-पट!

चित्रपटाच्या प्रिमियरला जाण्यापूर्वी अमिताभ यांनी सचिनचा चित्रपट पाहण्याची उत्सुकता ट्विटरवरून जाहीर केली होती. ”आज १०२ नॉट आउट’चे शूटींग केले आणि आता थोड्याच वेळात ‘२०० नॉट आउट’…. मास्टर ब्लास्टरसोबत ‘सचिन..’ चा प्रिमियर पाहणार. सचिनच्या क्रिकेटमधील कारकिर्दीप्रमाणेच त्याच्या चित्रपटाचा प्रिमियरही भव्य होता.  सचिनने खास निमंत्रण पत्रिकाही डिझाईन करुन घेतल्या होत्या. निमंत्रण पत्रिकेची संकल्पना आणि चित्रपटाचं कथानक यांची सुरेख सांगड घालत ‘रविश कपूर इन्व्हिटिशन्स’तर्फे ही निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली होती. या निमंत्रणासोबत सचिनची सही असलेली छोटी बॅटही देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 11:19 am

Web Title: sachin a billion dreams amitabh bachchan review on sachin tendulkar biopic
Next Stories
1 Sachin A Billion Dreams VIDEO : प्रिमियरमध्ये कलाकारांच्या मांदियाळीतही सचिनचे सारावरच लक्ष
2 शंभरी पार केलेल्या फॅनची बिग बींनी घेतली भेट
3 Abhijeet Bhattacharya ban on twiiter : ‘ट्विटर राष्ट्रविरोधी, हिंदूविरोधी आणि मोदीविरोधी’
Just Now!
X