News Flash

Sachin: A Billion Dreams: ‘जो खेले, वही खिले…’ पंतप्रधानांचा सचिनला अनोखा संदेश

मोदींनीही सचिनसोबतच्या भेटीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला

Sachin: A Billion Dreams: ‘जो खेले, वही खिले…’ पंतप्रधानांचा सचिनला अनोखा संदेश
‘सचिनः अ बिलिअन ड्रीम्स’ चित्रपट सचिनच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची खेळी आहे.

सचिन तेंडुलकर याने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना ‘सचिनः अ बिलिअन ड्रिम्स’ या आपल्या आगामी सिनेमाची माहिती दिली. ४४ वर्षीय सचिन हा स्वतः राज्यसभेचा खासदार आहे. सचिनने नुकतेच पंतप्रधानांसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर करून याबद्दल माहिती दिली.

सचिन तेंडुलरकच्या आयुष्यावर आधारित ‘सचिनः अ बिलिअन ड्रिम्स’ हा सिनेमा येत्या २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. पंतप्रधानांच्या भेटीवेळी सचिनसोबत पत्नी अंजलीही उपस्थित होती. ‘सचिन अ बिलिअन ड्रीम्स’ सिनेमाबद्दल पंतप्रधानांना सांगितले आणि मोदींनी शुभेच्छा दिल्या, असं ट्वीट सचिनने केले.

‘जो खेले वही खिले,’ हा प्रेरणादायी संदेशही पंतप्रधानांनी या भेटीत दिल्याचं सचिनने आपल्या ट्विटमध्ये सांगितलं. यासाठी त्याने मोदींचे आभारही मानले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही सचिनसोबतच्या भेटीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. सचिन तेंडुलकरसोबत चांगला वेळ घालवला असून, त्याचा जीवनप्रवास आणि कामगिरी १२५ कोटी भारतीयांसाठी अभिमानस्पद आणि प्रेरणादायी आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
सचिनच्या या सिनेमाचं दिग्दर्शन जेम्स अर्स्किन यांनी केलं आहे. या सिनेमात सचिनसह त्याची पत्नी, मुलगी, वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्र सिंह धोनीही दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2017 4:20 pm

Web Title: sachin a billion dreams sachin tendulkar met pm narendra modi
Next Stories
1 अटीतटीची लढाई होईल, तेव्हाच सगळ्यांना कळेल; राजकारणातील प्रवेशाबद्दल रजनीकांतची भूमिका
2 Jennifer Lawrence Pole Dance Leaked: जेनिफर लॉरेन्सचा मद्यधुंद अवस्थेत पोल डान्स; व्हिडिओ लीक
3 … यांना ओळखलंत का?
Just Now!
X