News Flash

सोनाली कुलकर्णीच्या ‘गुलाबजाम’ सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित

चवीने खाणाऱ्यांना प्रेमाने वाढायला झी स्टुडिओज् घेऊन येतोय 'गुलाबजाम'

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि झी स्टुडिओजने अतिशय चवीष्ट पद्धतीने नववर्षाची सुरुवात करत, प्रेक्षकांच्या भेटीला त्यांच्या नव्या सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वी . सोनालीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन आगामी ‘गुलाबजाम’ या चित्रपटाचा टीझर पोस्ट केला आहे. ‘माझी लाडकी गोष्ट..राधा आणि आदित्यची..आमच्या स्वयंपाकाची..’, असं लिहित तिने हा टीझर पोस्ट केला.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि झी स्टुडिओजचा आगामी ‘गुलाबजाम’ सिनेमाचे टीझर प्रदर्शित करण्यात आले होते. सोनालीने ‘माझी लाडकी गोष्ट..राधा आणि आदित्यची..आमच्या स्वयंपाकाची..’, असं लिहित हा टीझर पोस्ट केला होता. नुकतेच या सिनेमाचे आणखीन एक पोस्टर प्रदर्शित झाले आहे. सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर हातात लाटणं आणि डाऊल घेऊन उभी असलेली दिसत आहेत. पोस्टरमध्ये सोनालीच्या चेहऱ्यावर हासू पाहायला मिळतं तर सिद्धार्थ मात्र थोडा चिडलेला दिसत आहे. ‘चवीने खाणाऱ्यांना प्रेमाने वाढायला झी स्टुडिओज् घेऊन येतोय ‘गुलाबजाम”, असे कॅप्शन देऊन सोनालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे.

कथेतील नाविन्य हे कुंडलकर यांच्या सिनेमांचं वैशिष्ट्य. गुलाबजाम टीझरनिमित्ताने पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय येतोय. ‘गुलाबजाम’ ही लंडनमध्ये राहणाऱ्या एका मराठी माणसाची कथा आहे. आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा काही खास मराठी खाद्यपदार्थ शिकण्यासाठी भारतात येतो. भारत भेटीत तो पुण्यात राहणाऱ्या राधाला (सोनाली कुलकर्णी) भेटतो. ती त्याला पारंपरिक मराठी पाककृती शिकवण्याचा निर्णय घेते. इथूनच त्यांच्या सुंदर आणि अर्थपूर्ण मैत्रीची सुरुवात होते. पण मैत्रीचे हे नाते कसे पुढे जाते, त्यात कशी वळणे येतात हे सर्व सांगणारी सुंदर कथा म्हणजे हा सिनेमा. तेव्हा आता सोनाली, सिद्धार्थ यांच्या साथीने सचिन कुंडलकर यांच्या ‘गुलाबजाम’ला प्रेक्षकांची पसंती मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 4:30 pm

Web Title: sachin kundalkar directed marathi actor siddharth chandekar actress sonali kulkarni starrer upcoming marathi movie gulabjaam second poster released
Next Stories
1 ‘पद्मावत’ पाहण्याचा पत्नीचा हट्ट तर पतीला हवी सुरक्षेची हमी
2 …तर करण जोहर तुरुंगात जाऊ शकतो
3 PHOTOS : ‘पद्मावत’च्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दीपिकाला मिळाली रणवीरची साथ
Just Now!
X