कुणाला आनंद वयाप्रमाणे वागण्यात मिळतो तर कुणाला वय विसरून स्वच्छंद वागण्यात. इथूनच सुरू होतात गंमती-जमती आणि शेवटी या दोघांच्याही तोंडी शब्द येतात ‘लव्ह यू जिंदगी’! अशीच कथा एस. पी. प्रॉडक्शन्स निर्मित आगामी मराठी सिनेमा ‘लव्ह यू जिंदगी’मधून पाहायला मिळणार आहे. ज्याचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरचं वैशिष्ट्य म्हणजे सचिन पिळगावकर एका सामान्य गृहस्थाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटातून सचिन पिळगावकर यांनी अनिरूद्ध दाते यांची भूमिका साकारलेली असून त्यांच्या आयुष्यातील गंमती जमती आपल्याला यातून अनुभवायला मिळणार आहे.

एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बामगुडे यांनी केली आहे. तर गेली १७ वर्ष झी टीव्ही, झी सिनेमा आणि झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे मनोज सावंत या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. दिग्दर्शनाबरोबरच कथा आणि पटकथालेखन ही मनोज सावंत यांनी केलं आहे.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’
Udayanaraje Bhosle received a warm welcome in Satara
साताऱ्यात उदयनराजे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन; कोणत्याही परिस्थितीत मी निवडणूक लढविणार
love you zindagi
‘लव्ह यू जिंदगी’

वय विसरून बेभान होणाऱ्या याच तरूण मनांना आपल्याकडे आकर्षित करणारा ‘लव्ह यू जिंदगी’ हा चित्रपट १४ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.