03 April 2020

News Flash

‘सेक्रेड गेम्स २’मध्ये भूमिका साकारल्यापासून अमेयला जाणवतेय ही समस्या

इन्स्टाग्राम पोस्टद्वारे अमेयने सांगितली समस्या

अमेय वाघ

‘नेटफ्लिक्स’वरील बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स २’ १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. पहिल्या सिझननंतर आता या दुसऱ्या सिझनमध्ये नेमकं काय होतंय, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना होती. त्याचसोबत या सिझनमध्ये काही नवीन कलाकारांचीही भर पडली आहे. यात मराठमोळा कलाकार अमेय वाघचाही समावेश आहे. ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजचा अमेय खूप मोठा चाहता होता, त्यामुळे त्यात काम करण्याची संधी मिळणे म्हणजे स्वप्न सत्यात उतरणे अशी प्रतिक्रिया त्याने दिली. मात्र या सीरिजमध्ये भूमिका साकारल्यापासून त्याला एक समस्या जाणवतेय. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून त्याने याबाबत सांगितलं.

‘डॅपर लूक’मधला फोटो पोस्ट करत अमेयने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘एक प्रॉब्लेम झालाय… सेक्रेड गेम्स २ बघितल्यापासून आजकाल कोणीच मला क्रिकेट खेळायला बोलवत नाही.’ अर्थात अमेयने ही पोस्ट मस्करीत लिहिली. कारण या सीरिजमध्ये तो खलनायकाची भूमिका साकारत आहे. मैदानाच्या खेळीदरम्यान सुरू झालेल्या वादानंतर तो कशाप्रकारे खलनायक बनतो हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.

आणखी वाचा : राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये प्रसाद ओक; ईडी चौकशीवरून सरकारला लगावला टोला?

‘सेक्रेड गेम्स’चा पहिला भाग प्रदर्शित झाल्यांनतर अमेयनं तो एका बैठकीतच संपूर्ण बघितला होता. अशा वेब सीरिजमध्ये काम करायला मिळावं असं तेव्हा त्याला वाटलं होतं. त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. दरम्यान ‘सेक्रेड गेम्स २’ला प्रेक्षकांकडून संमीश्र प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या सिझनइतका हा दुसरा सिझन आवडला नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2019 9:27 am

Web Title: sacred games 2 amey wagh tells us why he can not play cricket anymore ssv 92
Next Stories
1 राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये प्रसाद ओक; ईडी चौकशीवरून सरकारला लगावला टोमणा?
2 चित्र रंजन : चांगला पण तोकडा प्रयत्न..
3 आमिर खानच्या लेकीने ‘या’ क्षेत्रात निवडली करिअरची वाट
Just Now!
X