बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चे दुसरे सिझन नेटफ्लिक्सवर मध्यरात्री १२ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला आले. सेक्रेड गेम्स खास करुन त्यातील डायलॉगसाठी लोकप्रिय आहे. सेक्रेड गेम्समधील पहिल्या सिझनमधील डायलॉगने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. आता दुसरे सिझन प्रदर्शित होताच दुसऱ्या सिझनमधील डायलॉगदेखील प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीला उतरले आहेत.

सोशल मीडियावर सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनमधल्या डायलॉगचे काही मीम्स व्हायरल झाले आहेत. गणेश गायतोंडे केनिया वरुन बंटीला फोन करतो. तेव्हा बंटीने ‘यहां पार्ले जी खाना पड़ रहा है चाय में डुबोकर’ असे उत्तर देतो. बंटीचा हा डायलॉग सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला असून त्यावरील मीम्सदेखील व्हायरल झाले आहेत.

दुसऱ्या सिझनचे दिग्दर्शन अनुराग कश्यप व ‘मसान’ चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घायवान यांनी केले आहे. पहिला सिझन जिथे संपतो तिथूनच दुसऱ्या सिझनची कथा सुरू होते. या सिझनचीही कथा प्रेक्षकाला गुंतवून ठेवते. या सिझनमध्ये गणेश गायतोंडे परदेशात लपून बसला आहे आणि ड्यूटीवरून निलंबित केलेला सरताज सिंग त्याचा शोध घेत आहे. पहिल्या सिझनमध्ये अवघ्या पाच सेकंदांसाठी आलेली जोजो मॅक्सरहन्स या सिझनमध्ये गायतोंडेच्या जीवनातील महत्त्वाची भूमिका साकारत आहे.