News Flash

Sacred Games 2 : “पार्लमेंट अपने बाप का है” का म्हणतोय गणेश गायतोंडे?

जोजो आणि गणेश गायतोंडे यांच्यातला संवाद नव्या टिझरमध्ये दाखवण्यात आला आहे

बहुचर्चित वेब सीरिज सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सीरिजच्या पहिल्या पार्टमध्ये अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत. ज्यांची उत्तरं या पार्टमध्ये मिळणार आहेत. दरम्यान जोजो आणि गणेश गायतोंडे यांच्यात कसं नातं होतं हे उलगडणारा दुसरा टिझर समोर नेटफ्लिक्सने आणला आहे. नव्या डायलॉगचा हा टिझर आहे. या टिझरमध्ये गणेश गायतोंडे आणि जोजो यांच्यात कसं नातं होतं ते दाखवण्यात आलं. त्यात गणेश गायतोंडेला जोजो विचारते तुम्हे नंबर किसने दिया? तो म्हणतो प्रधानमंत्रीसे लिया पार्लमेंट अपने बापका है!

 

View this post on Instagram

 

Calling Ganesh Gaitonde for some long distance relationship tips.

A post shared by Netflix India (@netflix_in) on

याआधीच्या टिझरमध्येही एक डायलॉग समोर आला होता. ज्यामध्ये गणेश गायतोंडे विचारतो की ‘भगवान को मानते हो? पर कभी सोचा है की भगवान किसको मानता है?’ या डायलॉगनंतर आता जोजो आणि गणेश गायतोंडे यांच्यातला संवाद दाखवणारा टिझर समोर आला आहे. नेटफ्लिक्सने इंस्टाग्रामवर हा टिझर पोस्ट केला आहे.

गणेश गायतोंडेच्या Long Distance Relationship tips असं म्हणत हा टिझर पोस्ट करण्यात आला आहे. या टिझरमध्ये गणेश गायतोंडे जोजोला विचारतो, मरना है क्या तुझे? ती म्हणते चारबार ट्राय कर चुकी है! मग गणेश गायतोंडे म्हणतो अपुनसे मिलनेसे पहले मरनेका नहीं! या आणि अशा अनेक जबरदस्त डायलॉग्जचा उल्लेख या नव्या सिझनमध्ये असणार आहे. भोसले काय करणार? गणेश गायतोंडे काय करणार? दिलबाग सिंगने गणेशला काय मदत केली? सरताज सिंगला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार? त्रिवेदी कसा वाचणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सेक्रेड गेम्सच्या सिझन २ मध्ये मिळणार आहेत. हा सिझन २ नेटफ्लिक्सवर १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 2:13 pm

Web Title: sacred games 2 second teaser on netflix scj 81
Next Stories
1 रेणुका शहाणेंच्या सोशल मीडियावर व्यक्त होण्यावर पती आशुतोष राणा म्हणतात..
2 करिना कपूरला साकारायची श्रीदेवीची ही भूमिका
3 …म्हणून ‘झीरो’नंतर अनुष्काने घेतला चित्रपटातून ब्रेक!
Just Now!
X