सध्या सर्वत्र नेटफ्लिक्सवरच्या सीरिजचे क्रेझ पाहायला मिळते. त्यातील सर्वांच्या मनावार राज्य करणारी सीरिज म्हणजे ‘सेक्रेड गेम.’ या सीरिजमध्ये गणेश गायतोंडे या डॉनची आणि सरताज सिंग या पोलीस इन्स्पेक्टरची कहाणी दाखवण्यात आली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने गणेश गायतोंडे आणि सैफ अली खानने सरताज सिंगची भूमिका असलेले पहिला सिझन चांगलाच गाजला होते. आता लवकरच ‘सेक्रेड गेम २’ रिलीज होणार.

‘सेक्रेड गेम २’ प्रदर्शित होण्यापूर्वी ‘सेक्रेड गेम ३’ची जोरदार चर्चा सुरु आहेत. तसेच या तिसऱ्या सिझनमध्ये कोणते कालाकार झळकणार याची देखील सर्वत्र चर्चा सुरु आहे. परंतु चित्रपटाचे कास्टिंग डिरेक्टर गौतम यांनी सोशल मीडियाद्वारे या सर्व अफाव असल्याचा खुलासा केला आहे. ‘सेक्रेड गेम ३ बद्दल पसरवण्यात आलेल्या अफावांवर विश्वास ठेवू नका. सीरिजमधील प्रत्येक कलाकार हा माझ्या मित्र परिवारातील आहे. सेक्रेड गेमच्या पहिल्या सिझननंतर सर्वांनाच दुसऱ्या सिझनची उत्सुकता लागली आहे. नुकताच दुसऱ्या सिझनचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. आता लवकरच सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे’ असे वक्तव्य करत गौमत यांनी ‘सेक्रेड गेम ३’च्या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजचा पहिला सिझन चांगलाच गाजला. यामधल्या कुक्कू, बंटी, काटेकर, सुभद्रा, परूळेकर, बिपिन भोसले या सगळ्या व्यक्तीरेखाही चांगल्याच गाजल्या. ती कहाणी २५ दिवसांची होती. २५ दिवसात असे काहीतरी होते ज्यामुळे संपूर्ण शहर उद्ध्वस्त होते त्याभोवतीही ही कथा फिरते. तसेच सेक्रेड गेम्समध्ये गणेश गायतोंडे, बंटी, दिलबाग सिंग, सरताज सिंग यांच्या भोवती गुंफलेली ही कथा आहे.

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागात काय होणार याची उत्कंठा चाहत्यामध्ये आहे. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर या वेब सिरीजचे कथानक आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीनं साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिका प्रेक्षकांनी उचलून धरली होती. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेचे यासारखे अनेक संवाद सोशल मीडियावर हिट ठरले. शिवीगाळ, खून मारामारी, अश्लिल संवाद आणि दृश्यानं भरलेली ही वेब सीरिज जितकी वादाच्या भोवऱ्यात सापडली तितकीच ती प्रसिद्धही झाली होती. त्यामुळे आता कल्की आणि रणवीरच्या आगमनाबरोबर सीरिजचे कथानक कोणते वळण घेते याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.