24 February 2021

News Flash

‘इट का जवाब राधिका से…’, झोमॅटो आणि नेटफ्लिक्स इंडियाची राधिका आपटेवरुन जुंपली

झोमॅटोनेही 'राधिका आपटे है...' या ट्रेंडमध्ये उडी घेत त्यांच्या शैलीने ट्विट केलं.

नेटफ्लिक्स इंडिया, राधिका आपटे, ट्विट, Netflix India, Zomato

अभिनेत्री राधिका आपटेच्या नावाच्या चर्चा शमण्याचं नावच घेत नाही आहेत. नेटफ्लिक्स इंडियाच्या सलग तीन वेब सीरिजमध्ये राधिका महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकल्यामुळे सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून तिची आणि नेटफ्लिक्स इंडियाची खिल्ली उडवणारे बरेच मीम्स व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे नेटफ्लिक्स इंडिया आणि खुद्द राधिकाकडून या मीम्सकडे मोठ्या सकारात्मक दृष्टीने पाहिलं जात आहे.

आपण या सर्व मीम्सना किंवा सध्या सुरु असणाऱ्या चर्चांना प्रेक्षकांकडून होणारी प्रशंसा आणि त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद म्हणून पाहतो असं म्हणत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्य म्हणजे सोशल मीडियावर रेस्तराँ डिस्कव्हरी आणि फूड डिलीव्हरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या झोमॅटोनेही ‘राधिका आपटे है…’ या ट्रेंडमध्ये उडी घेत त्यांच्या शैलीने ट्विट केलं. राधिका आपटे एक अष्टपैलू आणि बहुरंगी अभिनेत्री आहे, ही बाब आतापर्यंत सर्वांच्याच लक्षात आली आहे. पण, झोमॅटोने चक्क पनीर या खाद्यपदार्थालाच तिच्यासोबत स्पर्धेत उतरवलं आहे.

वाचा : सर्वत्र व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मीम्सविषयी राधिकाची प्रतिक्रिया वाचली का?

तसं पाहायला गेलं तर बऱ्याच पदार्थांमध्ये पनीरचा समवेश असतो. मग ते शाही पनीर म्हणू नका किंवा मग चिली पनीर किंवा गार्लिक पनीर. विविध पदार्थांची नावं देत या सर्वच पदार्थांमध्ये पनीर असल्याचं म्हणत, झोमॅटोने ट्विट करत लिहिलं कोण म्हणतं की फक्त राधिकाच बहुरंगी आहे…

झोमॅटोच्या या ट्विटला नेटफ्लिक्स इंडियाच्या अकाऊंटवरुन त्याच तोडीचं उत्तरही देण्यात आलं. झोमॅटोने नमूद केलेल्या सर्वच पदार्थांमधील काही अक्षरांमधून नेटफ्लिक्सने राधिकाचं नाव तयार करत ती कशा प्रकारे सर्वत्र आहे, हे एका धमाल अंदाजात स्पष्ट केलं. ज्यानंतर ट्विटरवर अनेकांनीच या ट्विटवर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कोणी म्हटलं, ‘इट का जवाब राधिका से…’, तर कोणी हा आतापर्यंतचा सर्वोत्तम रिप्लाय आहे, असंही म्हटलं. सोशल मीडियावर नेटफ्लिक्स इंडिया आणि झोमॅटोमध्ये राधिकावरुन जुंपली आणि त्यात नेटफ्लिक्सनेच बाजी मारली असं म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 9:04 am

Web Title: sacred games fame bollywood actress radhika apte is everywhere netflix indias response to zomatos tweet is savage
Next Stories
1 विवेक अग्निहोत्रींच्या अंगलट आला #UrbanNaxals हा हॅशटॅग
2 जगातल्या सगळ्यात महागड्या लिलावात ‘या’ गाडीवर लागली तब्बल ३४१ कोटींची बोली
3 मध्यरात्रीनंतर दारावरील बेल वाजून जाणारी ‘ही’ महिला कोण?, पोलिसांकडून शोध सुरू
Just Now!
X