29 October 2020

News Flash

Sacred Games 2 : ‘इस बार तो भगवान खुदको भी नहीं बचा सकता!’

पहिल्या सिझन इतकीच दुसऱ्या सीझनचीही उत्सुकता ताणली गेली आहे, अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे या सिझनमध्ये मिळणार आहेत

‘बिच्छु हैं अपनी कहानी चिपक गयी है आपको!’ असं म्हणत आपली गोष्ट सांगणारा गणेश गायतोंडे परत येतो आहे. होय सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन लवकरच आपल्या भेटीला येणार असल्याची घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे. नेटफ्लिक्सने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक टिझर पोस्ट केला आहे. यामध्ये काही संवादांचा वापर करण्यात आला आहे. मात्र शेवटचा संवाद नव्या सीझनची उत्सुकता ताणून धरणारा आहे. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, जितेंद्र जोशी, गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, सुरवीन चावला, नीरज काबी, कुब्रा सेट, जतिन शर्मा, शालिनी वत्स अशा अनेक कलाकारांची फौज असलेला आणि दमदार अभिनयाची ट्रिट असलेला पहिला सिझन चांगलाच गाजला. त्याची चर्चाही झाली आता लवकरच या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

२५ दिवसात काय होणार? त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय असतो? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नव्या सीझनमध्ये मिळणार आहेत अशी कमेंट स्वतः नेटफ्लिक्सनेच केली आहे. तासाभरापूर्वी हा टिझर नेटकऱ्यांच्या भेटीला आला आहे. ज्याला एका तासात साडेचार हजार शेअर्स आणि ८ हजारच्या वर लाईक्स मिळाले आहेत. तर एक लाखापेक्षा जास्त लोकांनी हा टिझर पाहिला आहे. गणेश गायतोंडे, बंटी, दिलबाग सिंग, सरताज सिंग यांच्या भोवती गुंफलेली ही कहाणी आहे. यामध्ये काय होणार हे पाहणे हा प्रेक्षकांच्या औत्सुक्याचा विषय ठरला आहे. ‘तुम्हे लगता है भगवान सबको बचा लेगा? इस बार तो भगवान खुदको भी नहीं बचा सकता!’ या नव्या डायलॉगची भर डायलॉग टिझरमध्ये पडली आहे. त्यामुळे हा टिझर नेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिझन प्रेक्षकांना आवडला आहे आता दुसरा सिझन कसा असणार? त्याची चर्चाही चांगलीच रंगली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 11:56 am

Web Title: sacred games is coming back with a second season confirms netflix
Next Stories
1 तगडी स्टारकास्ट असलेला ‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2 Video : ‘शुभ लग्न सावधान’चा ट्रेलर प्रदर्शित
3 #Happy Birthday Kareena : सैफ अली खानच्या आधी करिनाच्या आयुष्यात होता ‘हा’ खान!
Just Now!
X