News Flash

Sacred Games 2: काय असणार गायतोंडेच्या तिसऱ्या बापाचे रहस्य?

देश संकटात आहे आणि या देशाला वाचवण्याची चावी गणेश गायतोंडेच्या तिसऱ्या बापाकडे आहे.

‘सेक्रेड गेम्स २’ या लोकप्रिय वेब मालिकेची चाहते गेले वर्षभर आतुरतेने वाट पाहात होते. अखेर या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सरताज, गायतोंडे, भाऊ आणि बंटी पुन्हा एकदा परतले आहेत. या ट्रेलरमधून मालिकेच्या पहिल्या पर्वातील लोकप्रिय व्यक्तिरेखा पुन्हा एकदा आपल्या भेटीस येतात. लवकरच युद्ध सुरु होणार असून देश संकटात आहे आणि या देशाला वाचवण्याची चावी गणेश गायतोंडेचा तिसरा बाप गुरुजीकडे आहे. या कथानकावर मालिकेच्या पहिल्या पर्वाचा शेवट झाला होता.

सेक्रेड गेम्सच्या पहिल्या पर्वात गुरुजी या खलनायकी व्यक्तिरेखेची फक्त तोंडओळख देण्यात आली होती. परंतु दुसऱ्या भागाचा ट्रेलर पाहता यात गुरुजी महत्वाची भूमिका बजावणार आहे असे दिसत आहे. या शिवाय मालिकेत कल्की कोचलीन आणि रणवीर शौरी हे दोन नवीन कलाकार भरती झाले आहेत असे दिसते. या दोघांच्याही भूमिकांविषयी निश्चित अशी माहित देण्यात आलेली नसली तरी ट्रेलरमध्ये रणवीर पोलिसांच्या भूमिकेत तर कल्की गुरुजींची अनुयायी असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या पर्वातही कथानक पहिल्या पर्वाप्रमाणेच दोन टाईमलाईनमध्ये फिरणार आहे. एक टाईमलाईन ९०च्या दशकातील आहे, जेव्हा गायतोंडे मुंबईवर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. तर दुसरी टाईमलाईन वर्तमानातील आहे. जिथे सरताज सिंग मुंबईत होणाऱ्या हल्ल्याचे रहस्य उलगडवण्याचा प्रयत्न करतोय.

आजवर घडलेल्या कथानकात सरताज सिंह म्हणजे सैफ अली खान खलनायक गणेश गायतोंडेचा पाठलाग करताना दिसतो. त्याचा पाठलाग करताना मुंबई संकटात आहे आणि मुंबईला वाचवण्यासाठी फक्त २५ दिवस उरले आहेत असे त्याला कळते. दुसऱ्या पर्वात देशावरील संकट आणि त्याचे गायतोंडेबरोबर असलेला संबंध कळणार आहे. तसेच सर्वात मोठे रहस्य म्हणजे गायतोंडेचा तिसरा बाप गुरुजी नेमका कोण आहे, त्याचे रहस्य सरताज सिंह दुसऱ्या भागात सोडवणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 4:02 pm

Web Title: sacred games season 2 trailer breakdown mppg 94
Next Stories
1 Bigg Boss Marathi 2 : KVR ग्रुपमधील मतभेद संपता संपेना !
2 ..अन् प्रभूदेवासोबत थिरकली सलमानची पावले
3 ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये मिळणार या पाच प्रश्नांची उत्तरं
Just Now!
X